Breaking News

दिपक केसरकर यांचे ठाकरे गटाला आव्हान, कशात विलीन व्हायचं ते त्यांनी ठरवावं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिंदे गटाला मिळाले

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ४० बंडखोर आमदारांनी जरी गुवाहाटीत तळ ठोकलेला असला तरी मुळ पक्षालाच अर्थात उध्दव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यामुळे एकाबाजूला उध्दव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांना परतण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला शिंदे गटाच्या दिपक केसरकर यांनी थेट आता ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला एक प्रकार आव्हान देत म्हणाले की, जी शिवसेना आहे ती आम्हीच आहोत. कशात विलीन व्हायचं ते त्यांनी ठरवावं, असे आव्हान उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना दिले.

तर दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे गटात असलेले उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे ही आता एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे आजस्थितीला उध्दव ठाकरे यांच्याकडे फक्त निवडणूक आलेले एकमेव मंत्री आदित्य ठाकरे हे राहिले आहेत. तसेच काही मुंबईतील निवडक आमदार सोबत आहेत.

चौधरी यांना गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ. १६ लोक ५५ लोकांचा निर्णय घेऊ शकणार नाहीत. जी शिवसेना आहे ती आम्हीच आहोत कारण आमच्याकडे सगळे लोक आहेत. उरलेल्या १४ लोकांनी आमच्याबरोबर यायचं की विलिनिकरण करायचं याचा त्यांनी विचार करावा, असेही ते म्हणाले.

जिकडे बहुमत असते त्यांचाच पक्षनेता असतो. जो विधिमंडळ पक्ष असतो तो मूळ पक्षापासून वेगळा असतो. त्याला वेगळं अस्तित्व असल्यामुळे त्याची नोंदणी सहा महिन्यांच्या आत करावी लागते. आमची ही नोंदणी झालेली आहे. यावर ५५ आमदारांच्या सह्या आहेत. आमदारांनी एकमताने एकनाथ शिंदे यांना आपला नेता म्हणून त्यावेळीच निवडलेलं असल्याचे त्यांनी सांगितले.

आता उध्दव ठाकरे यांच्यापासून जवळपास शिवसेनेचे ४० च्या जवळपास तर अपक्ष आणि सहयोगी पक्ष असलेले सर्वच आमदार दूरावले आहेत. त्यामुळे १५-१६ जणांच्या संख्या बळावर उध्दव ठाकरे हे काय करणार आणि संसदीय राजकारणात कसे टिकणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

शरद पवार यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे लबाडाघरचं आवताण…

सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. १० वर्षांत स्वतः काही केले नाही, आणि हिशेब आम्हाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *