Breaking News

डॉ अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल, सरकार मध्ये एक फूल, दोन डाउनफूल…

मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजपा सरकार मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे. तर सातत्याने दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रश्नावरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी हल्लाबोल केला.

राज्यातील शेतकरी आणि महिला, बेरोजगारी या मुद्यावर आयोजित राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ अमोल कोल्हे यांच्याकडून शेतकरी मोर्चाचे स्वागत करण्यात आले. यापार्श्वभूमीवर आयोजत सभेत बोलत होते.

डॉ अमोल कोल्हे म्हणाले, अदानी यांच्यानंतर देशातील सरकार केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ करते, पण येथील कष्टकरी जनतेचे दु:ख त्यांना दिसत नाही. सरकार मुद्यांचे बोलत नाही, त्यामुळे जनतेचे महत्त्वाचे प्रश्न भरकटत आहेत. पालकमंत्री हे मालकमंत्री झालेत आहे. राज्यातील सरकार एक फूल, दोन डाउनफूल सरकार अशी खोचक टीकाही केली.

खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवत आहेत. दरम्यान गेले २२ दिवस देशात कांदा निर्यातीवर बंदी आहे. पण सरकारमधील एकही नेता यासाठी दिल्लीतील सरकारला डोळ्यात डोळे घालून प्रश्न करत नाही, निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत नाही, असे देखील म्हणाले.

अमोल कोल्हे म्हणाले की, रामाचे नाव मनात ही घेतले तरी चालेल, अन् अयोध्येतही जाऊन घेतले तरी चालेल. रामाचा मक्ता कोण घेतंय हे देशातील जनता पाहतंय असा  इशारा दिला.

Check Also

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *