Breaking News

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान बनेल

भारतातील लोकशाही आणि इंग्लडच्या लोकशाही पध्दतीत मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. या लोकशाहीमुळेच ब्रिटनमध्ये बहुसंख्य श्वेतवर्णिय आणि ख्रिश्चन धर्मिय नागरिक असतानाही भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे अल्पसंख्याक असलेले हिंदू पंतप्रधान बनले. यापार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतात अल्पसंख्याक समजला जाणाऱ्या मुस्लिम समुदायातील हिसाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान बनेल असे वक्तव्य करत देशातील लोकशाहीवर विश्वास व्यक्त केला.

कर्नाटकातील विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना असदुद्दीन ओवेसी यांनी हे वक्तव्य केले.

ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी एक ट्विट केलं होतं. ब्रिटनने एका अल्पसंख्याक समुदायातील सदस्याला पंतप्रधान बनवलं आहे. हे आपणही स्वीकारलं पाहिजं, असे सूचक वक्तव्य करत भाजपाने सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान बनण्याला केलेल्या विरोधावरून अप्रत्यक्ष टीका केली. त्यावरून माध्यम प्रतिनिधींनी असदुद्दीन ओवेसी यांना प्रश्न विचारला होता.

असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं की, एक दिवस हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल. पण, भाजपाला मुस्लिमांना देशातून हाकलून लावायचे आहे. मुस्लिमांची दाढी, टोपी, जेवण, झोपणं सर्व देशासाठी धोकादायक वाटतं. एक भाजपाचा खासदार म्हणाला, मुस्लिमांवर बहिष्कार घाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त बोलतात ‘सबका साथ सबका विकास.’ मात्र, मुसलमानांची ओळख पुसणे हेच भाजपाचे धोरण असल्याची टीका त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोंदीवर केली.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *