Breaking News

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताना खर्गे म्हणाले, एका कामगाराचा मुलगा…

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांचा पराभव करत विजय मिळविला. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आवर्जून उपस्थित होते. याशिवाय अनेक नेते आणि कार्यकर्त्येही या कार्यक्रमास हजर होते.

अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, एका कामगाराचा मुलगा, पक्षाचा साधा कार्यकर्ता आज एका ऐतिहासिक राजकिय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनला आहे. हा सगळा प्रवास फक्त लोकशाही पध्दतीने चालणाऱ्या काँग्रेस पक्षामुळे झाला. आता आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना वाचविण्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करायचे आहेत असेही स्पष्ट केले.

तत्पूर्वी काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी मल्लिकार्जून खर्गे यांना निवडणूक प्रमाणपत्र दिले. तसेच या निवडणुकीमुळे काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रियाही मधुसूदन मिस्त्री यांनी दिली. काँग्रेस अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाषण करताना हा क्षण भावूक असल्याची भावना मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली. तसेच एका सामान्य कुटुंबातील मुलाला काँग्रेस अध्यक्ष होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही खर्गे यांना शुभेच्छा दिल्या. मी खर्गे यांचे मनापासून अभिनंदन करते. ते एक अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभावचा काँग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यापासून ते अध्यक्षपदाचा प्रवास त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्व केला आहे. मी पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते, असेही त्या म्हणाल्या.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *