Breaking News

आता रेड झोनमध्येही मिळणार या सवलती राज्य सरकारकडून सुधारीत मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र या कालावधीत सुरुवातीला रेड झोनमधील व्यवहाराला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या सवलतींची अंमलबजावणी २२ मे पासून ३१ मे पर्यंत करण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुधारीत मार्गदर्शक तत्वानुसार
रेड झोनमधील अत्यावश्यक दुकाने सुरु राहण्याबरोबर अनावश्यक असलेली दुकानेही सुरु राहणार आहेत. मात्र ती पुर्वीच्या मार्गदर्शक तत्वानुसार.
ई-कॉमर्सवरून अत्यावश्यक वस्तुंसह अनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आलीय.
या झोनमधील शॉपींग मॉल, उद्योग यांना परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र आता या सर्व गोष्टी देखभालीसाठी, मशनरींची तपासणी आणि मान्सूनपूर्व कामासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
खाजगी आणि सरकारी इमारतीची बांधकामे सुरु करण्यास आणि त्या साईटस खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली. तसेच मान्सूनपूर्वच्या कामासाठी परवानगी देण्यात आली.
वाहनांमध्ये दुचाकीला परवानगी नाकारण्यात आली. तर तीन चाकी अर्थात रिक्षा प्रवासाला अत्यावश्यक असेल तर १ प्रवाशाच्या परवानगी सह आणि चारचाकी वागनाला ३ व्यक्तींसह प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली.
याशिवाय सर्व अत्यावश्यक सेवेतील आरोग्य व मेडिकल, ट्रेजरी, आपतकाली परिस्थिती व्यवस्थापनातील कर्मचारी, पोलिस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व शासकिय विभागाचे कर्मचारी आरटीओ, मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचे कर्मचाऱ्यांसह कार्यालये ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जेवणाची होम डिलीव्हरी करणाऱ्या खानावळी, हॉटेल्स-रेस्टॉरंट सुरु राहणार.
याशिवाय यापूर्वी ज्या ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आली होती. त्या सर्व गोष्टी सुरु राहणार.
तर नॉन रेड झोनमध्ये अर्थात ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये
कोणतीही गोष्ट करण्यासाठी कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
स्पोर्ट कॉम्पलेक्स, स्टेडिया आदी गोष्टी खुल्या ठेवण्यास परवानगी. मात्र समुह कार्यक्रम करण्यास परवानगी नाही.
सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी वाहतूकीला परवानगी देत दुचाकीवर फक्त १, तीन चाकी रिक्षामध्ये चालकासह दोन, चारचाकी वाहनामध्ये १ चालकासह दोघांना परवानगी देण्यात आली.
सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मार्केट, दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कंटेन्मेंट भागात नियम व अटी पूर्वीप्रमाणेच राहणार. तसेच या भागात राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशाशिवाय जिल्हा प्रशासन, विभागीय अधिकाऱ्याचे प्रशासन राज्याच्या मुख्य सचिवांच्या पूर्व परवानगीशिवाय आदेश पारीत करू शकणार नाही.

Check Also

अॅड असीम सरोदे यांचा आरोप, न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतरही एक हजार कोटींच्या रोख्यांची छफाई

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने केलेला निवडणूक रोखे घोटाळा जनतेसमोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *