Breaking News

३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन अर्थात missionbeginagain पण फिरण्यावर बंधने राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी
लॉकडाऊनची ६ ची मुदत अर्थात missionbeginagain चा पहिला टप्पा ३० जून रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३० जूननंतरही पुन्हा लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जाहीर केले. याकालावधीत कोरोना विषाणू रोखण्यात सरकारला पुरेसे यश आले नसल्याने यात मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या लॉकडाऊनची मुदत ३१ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.
याकालावधीत missionbeginagain आणि केंद्राच्या अनलॉक-१ प्रमाणे दिलेल्या सवलती कायम ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या सर्व सवलती फक्त आता गरजेनुसार नागरिकांना वापरण्याची अट या नव्या अध्यादेशानुसार घालण्यात आली आहे. या दुसऱ्या टप्प्यात आणखी काही सवलती देण्यात येणार असून त्या टप्प्याटप्याने देण्यात येणार असल्याचे अध्यादेशात सांगण्यात आले आहे.
तसेच नागरिकांना त्यांच्या खरेदीसाठी आणि शाररीक व्यायामासाठी एका विभागातून दुसऱ्या भागापर्यतच्या जागेची अट घालण्यात आली आहे. याशिवाय विना कामाचे बाहेर फिरण्यावर बंधन घालण्यात आली असून फक्त कामानिमित्त-रोजगारच्या अनुषंगाने आणि गरजेनुसारच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर आपतकालीन २००५ च्या कायद्यातील कलम ५१ खाली आणि आयपीसी कलम १८८ खाली कारवाई करण्याचा इशाराही राज्य सरकारने दिला आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *