Breaking News

जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य

मुंबई : प्रतिनिधी
प्लाझ्मा देणारे जीवनदाते आहेत. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाउल पुढे टाकले आहे. एप्रिलमध्ये आपण प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
नागपूर येथील शासकिय महाविद्यालयात प्लाटीना प्रोजेक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायलचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.
ही काही नवीन गोष्ट शोधून काढलेली नाही. १०० वर्षांपासून त्याचा उपयोग होतो आहे. आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लशीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात पण इथे तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देत असल्याचे त्यांनी सांगितले.
रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. पण प्लाझ्मा डोनेशनबाबत बऱ्या झालेल्या रुग्णांच्या अंगात अधिक काळजी घ्यावी लागते. १० पैकी ९ रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो. प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल. दीड महिन्यांपूर्वी केंद्रीय टीम येऊन गेली तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती, पण आता परवाच ही टीम परत येऊन गेली आणि त्यांनी महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. ही मोठी उपलब्धता असून आपण मध्यम आणि गंभीर रुग्णांवर जिथे केअर नसलेल्या ठिकाणी प्लाझ्मा मशीन मागवत आहोत. केंद्रांमध्ये जमा केलेले प्लाझ्मा संकलित केले जाईल.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *