Breaking News

काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; एका महिन्यानंतर निवडणूक ‘या’ तारखेला मतमोजणी ज्येष्ठ नेत्यांनी केले जाहीर

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून आणि निवडणूकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निर्णय प्रक्रियेवर पक्षातंर्गत काही नेत्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यातच पक्षातील २३ नेत्यांनी वेगळी भूमिका स्विकारल्यानंतर त्यातील काही जणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी सांगत ही निवडणूक एक महिन्यानंतर पार पडणार असल्याचे वृत्त पीटीआय या संस्थेने आज दिले.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबरला होणार आहे. याबाबतची अधिसुचना २२ सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. तर मतमोजणी १९ ऑक्टोबरला पार पडणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान राबवली जाणार आहे. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुकीचे वेळापत्रक एकमताने मंजूर करण्यात आल्याचे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, खासदार राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं, अशी विनंती ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. हे वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकत प्राथमिक सदस्यत्वासोबतच सर्व पदांचा आझाद यांनी राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडताना काँग्रेस खासदार राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींची विचारसरणी अत्यंत वेगळी आहे. ती विचारसरणी पक्षातल्या ब्लॉक पातळीपासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही, असे खान यांनी राजीनामा देताना म्हणाले होते. तर राहुल गांधी अपरिपक्व आणि बालिश आहेत, असा शाब्दिक हल्ला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या नाराजी पत्रात गुलाम नबी आझाद यांनी केला होता.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *