Breaking News

संजय राऊतांच्या त्या ट्विटवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो खुलासा

देशात आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा नुसता वास आला तरी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या ईडी-सीबीआय आणि आयकर विभागाकडून चौकशीचा ससेमिरा लावला संबधित विरोधी पक्षाच्या किंवा भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागे लावला जातो. मात्र भाजपाशी संबधित नेता कितीही भ्रष्ट आणि खंडणीखोर असला तरी त्या भ्रष्टाचारी व्यक्तीच्या विरोधात ईडी-सीबीआय आणि आयकर विभागाकडून कोणतीच छापेमारी होत नाही असा आरोप सातत्याने देशातील राजकिय विरोधकांकडून केला जातो. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कॅसिनोमधील एका जुगाराच्या टेबलवर बसून जुगार खेळत होते असा आरोप करत एक फोटो ट्विट केला.

त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मकाऊ येथील एका हॉटेलच्याबाहेर कुटुंबियासोबत असल्याचा फोटो ट्विट करत आपण मकाऊ येथेच आहे. तसेच तेथील तळमजल्यावर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. मी कुटुंबियांसोबत जेवण झाल्यानंतर कुटुंबियांसोबत बसलो असता कोणीतरी तो फोटो काढलेला फोटो आहे असा खुलासा केला.

तसेच मकाऊ हॉटेलच्या बाहेर कुटुंबियासोबत हॉटेलच्या समोर आणि त्यानंतर एका बोटीत बसलेला फोटोही चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केला.

विशेष म्हणजे संजय राऊत यांनी फक्त फोटो ट्विट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अप्रत्यक्ष मकाऊ दौऱ्यावर असल्याचा आरोप केला. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच मकाऊ मध्ये कुटुंबियासोबत असल्याचे स्पष्ट करत संजय राऊत यांच्या आरोपाला एकप्रकारे पुष्टी दिली.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *