Breaking News

संजय राऊत यांनी ट्विट केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो खेळतानाचा फोटो राज्याच्या राजकारणात एकच खळबळ, ३.५ कोटी जुगारात हरल्याचा गौप्यस्फोट

देशात आणि राज्यातील सत्तेत भाजपा असल्याने भाजपाचे नेते परदेशात जाऊन कधी काय करतील याचा नेम आता राहिला नाही. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ येथे कॅसिनोमध्ये जाऊन जुगार खेळतानाचा एक फोटो शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विट करत ३.५० कोटी रूपये जुगारात हरल्याचा आरोप केला. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे राज्यात एकच खळबळ उडाली.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्र पेटलेला आहे. आणि हे महाशय मकाऊ येथे जाऊन जुगार खेळत आहेत. फोटो झुम करून पहा ते तेच आहेत ना पिक्चर अभी बाकी आहे असा इशाराही भाजपाला दिला.

तसेच संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ दौऱ्याचे माझ्याकडे २२ फोटो आणि १० व्हिडिओ असल्याचा दावा करत हळुहळू हे सर्व फोटो आणि व्हिडिओ उघडकीस आणणार असल्याचा इशारा देत पुढे म्हणाले, स्वतःला हिंदूत्ववादी म्हणवून घेणारे नेत्यांना परदेशात जाऊन काय करतात आणि त्यांच्याजवळ इतका पैका कोठून येतो असा सवालही उपस्थित केला.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट करत म्हणाले, मकाऊ येथील वेलेशाइन येथे साधारणतः ३.५० कोटी रूपये जुगारात उडविल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदूत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कुठे असा खोचक सवालही भाजपाला केला.

संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनोतील जुगार खेळतानाचा फोटो उघडकीस आणल्यानंतर बावनकुळे यांच्यावर टीका करताना म्हणाले, ते म्हणे, फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. जाऊ द्या. त्यांची सोबत असलेली फॅमिली चीनी आहे का असा असा सवाल करत ते म्हणे, जुगार खेळले नाहीत. मग त्यांच्या टेबलावर मग मारूती स्त्रोत सुरू आहे, जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही का असा गर्भित इशाराही दिला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

केसरकरांच्या त्या व्हिडिओवर सुप्रिया सुळे यांचा सवाल, या मंत्र्यांना झालंय तरी काय?

रविवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारालाच भरती कधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *