Breaking News

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचे जाहिर नामे प्रसिध्द झाले. यापैकी काँग्रेसच्या न्याय पत्र या जाहिरनाम्याची चर्चा सर्वचस्तरामध्ये झाली. विशेष म्हणजे आतापर्यंत निवडणूकीच्या कालावधीत जाहिरनामा प्रसिध्द करण्यापासून ते जाहिरनामा पर्यंत भाजपाच आघाडीवर असते. परंतु यावेळच्या लोकसभा निवडणूकीत भाजपापेक्षा एक पाऊल पुढे राहण्याचे काम काँग्रेसने केले आहे.

आज १४ एप्रिलचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपाने आज संकल्प पत्र जाहिरनामा प्रसिध्द केला.

काय आहेत संकल्प पत्रान्वये त्यांच्या मतदारासाठी या खालील आश्वासने दिली आहेत…..

1.मुद्रा योजनेतील कर्जांची लिमिट १० लाखावरुन २० लाख.

2.लखपती दीदी योजनेचा विस्तार करून ३ कोटी महिलाना लखपती बनवणार

3. आयुष्मान भारत योजना सतव वर्गातील ७० वर्षे वयावरील नागरिकाना लागू करणार

4 पीएम आवास योजनेत नवीन ३ कोटी घरे बनवणार

5 एकलव्य शाळांची संख्या वाढवणार

6.तमिळ भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा तीचा विस्तार करणार

7. महिलाना अनेक क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण देणार

8. टूरिजम क्षेत्राला बळ देणार. रोजगार वाढणार. अनेक क्षेत्राना संधी.

9. इको टूरिजम मधे आदिवासिना संधी

10. सोशल इन्फ्रा वाढवणार. हायवेवर ड्रायव्हर साठी

11. फिजिकल व डिजिटल इन्फ्रा वाढवणार

12. इंडस्ट्री ४.० साठी अनेक उपाय.हा प्रमुख कार्यक्रम. नवीन विचाराने आधुनिक कार्यक्रम

13. नवीन रोजगार संधी उपलब्ध करुन देणार

14. वंदे भारत ३ प्रकार स्लीपर, चेअर, मेट्रो

15.बुलेट ट्रेन नवीन उत्तर, दक्षिण, पुर्व भारतात टाकणार

16. देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिभर करणार. एनर्जी, खाद्य तेल प्रायोरीटी

17.सुर्यघर योजनेचा विकास

18 ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, सरंक्षण आयुधे हब, अनेक क्षेत्रात अग्रेसर.

19. विश्वबंधू भारत. सर्व जगातील मानवतेच रक्षण ही भारताची जबाबदारी

20. वन नेशन वन इलेक्शन One nation One election

21. समान नागरी कायदा Uniform Civil Code

22. Anti corruption drive to continue.

23. भारताला सर्वोच्च स्थानावर नेणार.

24. १४० कोटींची ambitions is modi’s mission

25. ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन करणार

आदी घोषणा संकल्प पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *