Breaking News

पत्रकार परिषदेतही सबकुछ देवेंद्र फडणवीसच विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर शांतच

मुंबईः विशेष प्रतिनिधी
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आणि सरकारच्या धोरणाविरोधात घेण्यात येणाऱ्या मुद्यांची माहिती देण्यात येते. त्यानुसार सध्याच्या विरोधी पक्षात असलेल्या भाजपा व त्यांच्या आघाडी पक्षाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. मात्र या पत्रकार परिषदेत सबकुछ देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे दिसून येत होते. तर त्यांचे सहकारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शांतच पहायला मिळाले.
विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेला फक्त विधान सभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विरोधी पक्षाची भूमिका मांडली. मात्र या पत्रकार परिषदेला उपस्थित असेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर मात्र गप्प होते. तसेच या पत्रकार परिषदेला रासपचे महादेव जानकर, तसेच आरपीआयने दांडी मारली. तर रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत उशिरा पोहोचले. त्यामुळे विरोधकांमध्ये तालमेळ नाही की काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात असतानाच्या पत्रकार परिषदांना या पक्षाचे नेते संबोधित करत असत तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या संवादानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते संवाद साधत असत. मात्र सत्तेत असताना जसे मुख्यमंत्री पदी असलेले देवेंद्र फडणवीसच सर्व मंत्र्यांच्यावतीने बोलत तसेच काहीसे चित्र आजच्या परिषदेतही दिसून आले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

One comment

  1. V. B. Chandanshive

    An independent and imparial investigation in Bhima Koregaon case is necessary rrespective of fact which party is in power. The principle of rule of law has to be adhered and investigation has to be conducted.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *