Breaking News

टिपू सुलतान वाद: चंद्रकांत पाटील यांचा इशारा, तर महाराष्ट्रभर आंदोलन टिपू सुलतान नामकरण वाद पेटला

मराठी ई-बातम्या टीम

मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याविरोधात भाजपा, बजरंग दलाने नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे नामकरण करून उद्घाटन करण्यात आले. यावरून आता भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रभर यासंदर्भात आंदोलनचे लोण पसरणार असल्याचा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

ही दडपशाही थांबली नाही तर या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रभर पसरेल. मी धमकी देत नाही पण वस्तुस्थिती मांडणे हा माझा स्वभाव आहे. देश स्वतंत्र्य झाल्यापासून परकियांच्या एक एक खुणा आपण पुसत आहोत. दुसऱ्या बाजूला टीपू सुलतानचे नाव देण्यासाठी चढाओढ सुरु आहे. हे कोणालाच मान्य नाही आणि त्यासाठी भाजपा आंदोलनाला पाठिंबा देत आहे. ही दंडुकेशाही थांबली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देत तिथे नाव आधीपासूनच असेल तर ते काढायलाच पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

गेल्या वेळी मुंबईत भाजपाचा महापौर होत होता. राज्य सुरळीत चालवण्यासाठी अमित शाह यांनी मुंबई महापालिका शिवसेनेला देण्यास सांगितले. मात्र आता आम्ही ऐकणार नाही. महापौर भाजपाचा होण्यासाठी जी संख्या लागते त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडूण येतील. भाजपा मनसेसोबत युती करणार नाही. राज ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यामुळे मनसेसोबत युती करण्याचा भाजपाचा प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी टिपू सुलतानवरून मुंबईत गदारोळ झाला आहे. मालाडमधील क्रीडा मैदानाचे टिपू सुलतान असे नामकरण करण्याला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आघाडी सरकारचे मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले. हे नाव म्हैसूरचे माजी शासक टिपू सुलतान यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मालवणी या मतदारसंघातून अस्लम शेख हे सातत्याने निवडूण येत असून हा त्यांचा बालेकिल्ला असल्याचे सांगण्यात येते.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *