Breaking News

भाजपाने दिली महाविकास आघाडीला “हुकूमशाही” सरकारची उपमा नावाजलेल्या पोलिसांना नको ती कामे करावी लागत असल्याचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
अॅन्टालिया बंगल्याजवळ स्फोटक सापडल्याप्रकरणी अटक झालेल्या मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून भाजपाकडून सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्याता आता महाविकास आघाडी सरकारचे नामकरण करत “हुकूमशाही ठाकरे सरकार” अशी उपहासात्मक उपमा ट्विट करत दिली.
हि स्फोटक ज्या गाडीत आढळून आले. त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन हा तपास अधिकारी सचिन वाझे यांच्या संपर्कात आणि परिचयाचा असल्याची आणि हिरेन याची गाडी सचिन वाझे हेच वापरत असल्याचीही माहिती पुढे आली. त्यामुळे यासंपूर्ण प्रकरणामागे वाझे हेच असल्याचा संशय दृढ झाला. त्यातच मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने याप्रकरणातील गुढ आणखीनच वाढले.
त्यामुळे पोलिसांच्या खांद्यावर बंदुका ठेवून गोळ्या झाडण्याचे पाप या सरकारकडून केलं जात असल्याचा आरोपही भाजपाने ट्विटवरून केला आहे.
नुकतेच याप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझेचा हॅडलर कोण? असा सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वाझे साठी मला मुख्यमंत्री असताना फोन केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे सरकारमधील हॅण्डलर कोण याचा शोध एनआयएने करावा अशी मागणी केली.
फडणवीस यांनी एकाचवेळी हॅण्डलर कोण असा सवाल करत दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांचे नाव घेतल्याने याप्रकरणात थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच संशयाच्या फेऱ्यात उभे केले.
तसेच राज्यात आघाडीचे नेतृत्व शिवसेनेच्या हाती असले तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे अर्थात गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने या दोन्ही पक्षांकडून महाराष्ट्र पोलिसांवर दबाव टाकून त्यांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाने एका कार्टूनमधून दाखविला आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात ६२.७१ टक्के मतदान

मागील काही दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणूकीच्या प्रचारामुळेही राजकिय वातावरण चांगलेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *