Breaking News

पुरस्कार स्विकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, लता मंगेशकर माझी मोठी बहीण बोलताना झाले भावूक

साधारणत: चार दशकांपूर्वी मराठी संगीतकार सुधीर फडके यांनी माझी आणि लता मंगेशकर यांची पहिल्यांदा ओळख करून दिली. मात्र त्यानंतर त्यांच्या आणि माझ्यात जो स्नेह तयार झाला त्यामुळे त्या माझ्या मोठ्या बहिण्यासारख्या राहिल्या. त्यांच्याकडून मला बहिणीचे प्रेम मिळाले. त्या जशा सर्वांसाठी स्वरसम्राज्ञी होत्या तसे आज त्यांच्या नावाने दिलेला पहिला पुरस्कार हा सर्वांसाठी असून तो देशवासियांना समर्पित करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.

आज रविवारी षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात ‘लता दिनानाथ मंगेशकर’ यांच्या नावाने देणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर ते बोलत होते. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. यावेळी भाषणात लतादीदींच्या आठवणींनी उजाळा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदीं भावूक झाल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपा नेते विनोद तावडे आदींची उपस्थिती होती.

याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना पुरस्कार देण्यात आला. तर सिनेमातल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार नुतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांना जाहीर झाला असून संध्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले.

संगीत एक साधना आणि भावना आहे. जे अव्यक्त आहे, त्याला व्यक्त करण्याचे शब्द आहे. संगीत तुम्हाला राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यबोधाच्या शिखरावर पोहचवू शकते. मी सहसा कोणते पुरस्कार घेत नाही, पण जर पुरस्कार लतादीदींच्या नावानं आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून असेल तर इथे येणं माझं कर्तव्य होतं. आपण सर्वजण नशीबवान आहोत की संगीताचे सामर्थ, शक्तीला लतादीदींच्या रुपात आपण पाहीले. मंगेशकर परिवार पिढ्यांपिढ्या या यज्ञात आपली आहुती देत आलं आहे. माझ्यासाठी तर हा अनुभव खूप मोठा राहिला असल्याचे मतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.

जवळपास चार-साडेचार दशकं झाली असतील, लतादीदींशी माझा परिचय सुधीर फडकेंनी करून दिला होता. तेव्हापासून आजपर्यंत या परिवारासोबतचे अपार प्रेम आणि असंख्य घटना या माझ्या जीवानाचा भाग बनल्या आहेत. माझ्यासाठी लतादीदी स्वरसम्राज्ञी बरोबच जे सांगताना मला गर्व वाटतो, त्या माझ्या मोठ्या बहीण होत्या. त्यांच्याकडून मला नहेमीच मोठ्या बहिण्याचं प्रेम मिळालं. मी समजतो या पेक्षा मोठं आयुष्याचं सौभाग्य काय असू शकतं असे सांगत खूप दशकानंतर हा पहिला राखीचा सण असेल जेव्हा दीदी नसेल. मी त्यांचा खूप आदर करायचो, मात्र त्या नेहमी सांगायच्या माणूस आपल्या वयाने नाही तर कार्याने मोठा होतो. जो देशासाठी जेवढं करेल तो तेवढाच मोठा आहे. यशाच्या शिखरावर असताना अशा प्रकारचा विचार पाहिल्यावर आपल्याला त्यांच्या महानतेचा अनुभव येतो. लतादीदी वयाने आणि कर्माने देखील मोठ्या होत्या. लतादीदींनी संगीतात ते स्थान मिळवलं होतं की लोक त्यांना देवी सरस्वतीचं प्रतीरुप मानत होते. त्यांच्या आवाजाने जवळपास ८० वर्षे संगीत जगतात आपला ठसा उमटविल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

पिडीत महिला अपहरण प्रकरणी एच डी रेवन्ना यांना अटक

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल-भाजपाचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने घरातील महिलेवरच जबरदस्ती करत बलात्कार केल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *