Breaking News

माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा आरोप, देशातील “त्या” घटनांना पंतप्रधानांची संमती वाढत्या द्वेष आणि तेढ निर्माण घटनांवरून साधला पंतप्रधानांवर निशाणा

देशातील धार्मिक तेढ आणि द्वेषाच्या वातावरणावरून भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या घटनांचा निषेध नोंदविला जात नाही. त्यावरून या सर्व घटनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक समंती असल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर केला.

भाजपाच्यावतीने जाणूनबूजन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे. संयम किती पाळायचा याला मर्यादा आहे. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून निषेध नोंदवला जात नाही. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याला मुकसंमती आहे. त्यांच्याकडून जो सिग्नल येतो त्याप्रमाणे म्हैसूर असेल किंवा नवनवीन प्रकरणं काढली जातात. सगळ्या राज्यांमध्ये धार्मिक तेढ आणि द्वेषाचं वातावरण निर्माण केलं जातं. हिंसा घडवायचा प्रयत्नही होत आहे. हे भाजपाचं पद्धतशीर कारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रपती राजवट लावताना घटना नियम आहेत. हे राज्यपाल काहीही लिहू शकतील. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की मुख्यमंत्री आहेत हे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात जे घडत आहे ते दोन्ही बाजूंनी घडतंय. राज्याचं नाही देशासाठी हे हानिकारक आहे. जातीयवादी राजकारणामुळे देशात गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. एखादी निवडणूक जिंकण्यासाठी देशाचं नुकसान केलं जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मला राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या स्थिरतेबद्दल काहीच चिंता नाही. भाजपाचे कमळ ऑपरेशन इथे महाराष्ट्रात उपयोगी ठरणार नाही. त्यांच्याकडून आणखी काही घटनात्मक पद्धतीने काही होईल का हा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत देशात सध्या धार्मिक द्वेषाचं राजकारण सुरू आहे. अचानक काही लोकांना हनुमान आणि इतर गोष्टी आठवायला लागल्या आहेत. राजकीय लढाई ही घटनात्मक मार्गाने लढली पाहिजे. देशात सध्या असहिष्णुतेचं वातावरण कोण निर्माण करत आहे? धार्मिक द्वेषाच्या राजकारणाचा निषेध केला पाहिजे. या गोष्टीला कोणाचा मुक पाठिंबा आहे का? असा सवालही त्यांनी केला.

कुणाच्याही गाडीवर हल्ला होणं चुकीचे आहे. राणा दाम्पत्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवली आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करतील. देवेंद्र फडणवीस यांना अखंड भारताचा कार्यक्रम राबवू द्या. फक्त आम्हाला फडणवीसांनी अखंड भारताची रूपरेषा सांगितली, तर आमच्या बुद्धीत देखील भर पडेल. १३५ वर्षात काँग्रेसने घेतलेली भूमिका आता बदलणे शक्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *