Breaking News

“तुझी हिंम्मत कशी झाली?” राणा दांम्पत्यांना सवाल करणाऱ्या आजींची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट मुंबईतल्या घरी जावून घेतली सपत्नीक भेट

“तुझी हिंम्मत कशी झाली?”, “झुकेगा नहीं साला” असे म्हणत राणा दांम्पत्याला इशारा देणाऱ्या मुंबईतील ९२ वर्षीय आजीबाईंच्या भेटीसाठी पंतप्रधान दौऱ्याला गैरहजर रहात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सहकुटुंब त्या आजींच्या घरी जात त्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच तुम्हीच आमच्या घरी यायचं का? असा हक्काने सवाल करत विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला गैरहजर राहत आजींची भेट घेतली.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या राणा दांम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राणा दाम्पत्याने थेट मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर अनेक शिवसैनिकांसह ९२ वर्षांच्या चंद्रभागा आजी देखील मातोश्रीबाहेर थांबल्या. तसेच त्यांनी थेट राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत “तुझी हिंम्मत कशी झाली?” असा सवाल करत ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये “झुकेगा नहीं साला” म्हणत इशारा दिला होता.
चंद्रभागा आजींचा जोश पाहून आसपासच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील “रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे” अशी घोषणाबाजी केली होती. “रवी राणा दोन दिवस मातोश्रीवर आमच्या वहिनींना आणि सगळ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना कार्यकर्ते त्याला इंगा दाखवणार आहोत. तुझी हिंमत कशी झाली?”, असा सज्जड सवालही या आजीबाईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
आमच्या साहेबांवर आलेलं संकट आम्ही दूर करणार नाही का? साहेबांसाठी आम्ही झटणार. तिला (नवनीत राणा) वाटतं दोघंजण येऊ आणि गुपचूप जाऊ, पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही मातोश्रीवर येऊन दाखवाच, असे आव्हानही आजीबाईंनी दिले होते.
दरम्यान, चंद्रभागा आजींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच मातोश्रीमधून त्यांना फोन करून बोलावून घेतले होते. यावेळी फोनवर देखील चंद्रभागा आजींनी उद्धव ठाकरेंना तुमच्यासाठी आम्ही इथं बसलो असल्याचं सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की काळजी घ्या. फार वेळ बसू नका. चहापाणी झालं. मी म्हटलं साहेब जय महाराष्ट्र, तुमच्यासाठी आम्ही इथे बंगल्याच्या बाहेर उभे आहोत. ती कशी येतेय ते बघू आम्ही. मी इथेच बसणार. मातोश्रीवर तुम्हाला कुणी काही बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही, असं उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितल्याचं चंद्रभागा आजीनं सांगितले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *