Breaking News

त्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले, नावाप्रमाणे शरद पवार खरेच पॉवरफुल नेते विरोधकांचे दात आणि नखे गळून पडतील

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतमी अदानी यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अदानी उद्योग समूहाच्या कथित गैरकारभाची चौकशी करण्यासाठी जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल, असे वक्तव्य शरद पवारांनी मांडले होते.

यावर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार अदानीची चौकशी जेपीसीने नव्हे, तर न्यायालयाने करावी, असे म्हणत असतील, तर विरोधकांचे दात आणि नखे गळून पडतील, असा टोला लगावला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, तीन पक्ष एकत्र येऊन लढले, तरी आमच्यासमोर आव्हान नाही. कारण, पुढील वर्षी लोकसभा नंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. तोपर्यंत हे सर्वजण एकत्र राहणे अशक्य आहे. एकत्र राहिले तरी, उमेदवारीवरून वाद होण्याची शक्यता आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, चार पक्ष वेगळे लढले, तरी आम्ही एक नंबरलाच राहणार आहोत. थोडाफार मतांमध्ये फटका बसण्याची शक्यता असते. मात्र, आम्ही २०० च्या वरती जागा जिंकू, असा विश्वासही व्यक्त केला.

तसेच चंद्रकांत पाटील म्हणाले, सावरकर आणि अदानी प्रकरणात शरद पवारांनी बाजू घेतली की, मध्यस्ती करण्याचे कारणच उरत नाही. शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणे पावरफूल नेते आहेत. ते असल्याशिवाय सर्व विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत. ते बाहेर पडले की, बाकीचे गळून पडतात. त्यामुळे शरद पवार सावरकरवादी झाले किंवा सावरकरांवर खालच्या स्तरावर टीका करू नका असे सांगत असतील. अथवा अदानीची चौकशी जेपीसीने नव्हे तर न्यायालयाने करावी, असे म्हणत असतील, तर विरोधकांचे दात आणि नखे गळून पडतील, असेही भाकित केले.

शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील? असा प्रश्न विचारल्यावर चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, दीड वर्षात अनेकजण गळून पडतील. कारण, भाजपाच्या विरोधात लढणे सोपे नाही असा विश्वासही व्यक्त केला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *