Breaking News

शशी थरूर म्हणाले, पवारांचे लॉजिक योग्य…. पण विजय चौकापर्यंत साथ दिली जेपीसीवरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे वक्तव्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधकांकडून अदानी-मोदी प्रकरणी जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली चौकशी समिती योग्य राहिल असे वक्तव्य करत केले. यावरून काँग्रेससह इतर विरोधकांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी अदानी प्रकरणात शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं त्यावर भाष्य केले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शशी थरूर यांनी शरद पवारांचं जेपीसी बाबतचं लॉजिक योग्य आहे असं म्हटलं आहे.

यावेळी बोलताना काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, अदानी प्रकरणात जेपीसीबाबत जे वक्तव्य शऱद पवार यांनी केलं आहे ते लॉजिकली बरोबर आहे. शरद पवार यांचं म्हणणं हे आहे की अशा प्रकरणात जेव्हा जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समिती नेमली जाते तेव्हा ५० टक्क्यांहून जास्त सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे असतात. याचाच अर्थ अदानी प्रकरणात अशी समिती स्थापन झाली तर ५० टक्केहून जास्त लोक हे भाजपा आणि एनडीएचे असतील. तरीही आम्हाला असं वाटतं आहे की या सगळ्या प्रकरणात जेपीसी असली पाहिजे. जेपीसी स्थापन झाली तर विरोधकांनाही या प्रकरणात प्रश्न विचारता येतील. आपण या प्रकरणातली कागदपत्रं आणि फाईल्सही पाहू शकतो असेही स्पष्ट केले.

तसेच शशी थरूर म्हणाले, जेपीसीचा जो अधिकार आहे तो अधिकार आपण वापरला पाहिजे. त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. सरकाने अद्याप अदानी प्रकरणात जेपीसीला मान्यता दिलेली नाही. मात्र जी बाब शरद पवार बोलत आहेत ती वेगळी आहे. ६ तारखेला आम्ही विजय चौकापर्यंत गेलो होतो तेव्हा एनसीपीनेही आम्हाला साथ दिली होती याची आठवणही करून दिली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *