Breaking News

आदित्य ठाकरे यांचा सवाल, प्रदूषणावर नियंत्रण मिळवणार की नाही? आयुक्तांनी फक्त मुख्यमंत्र्यांना घोटाळ्यांमध्ये मदत करणं हे योग्य नाही

शिवसेना नेते, युवसेना अध्यक्ष,आमदार आदित्य ठाकरे यांनी मिधे सरकार आणि पालिका आयुक्ताना घेरलं. आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांनी फक्त मुख्यमंत्र्यांना घोटाळ्यांमध्ये मदत करणं हे योग्य नाही असा खोचक सल्ला देत. रस्ते घोटाळ्यावर हल्लाबोल केला. कालपासून दिवाळीचा डबल धमाका ट्वीटवरून झालाय, मी प्रशासकांना प्रश्न विचारला बेस्ट बीएमसी च्या बोनस बद्दल.. काही दिवस आधी हा बोनस दिला जातो… एक ट्वीट आणि विसर पडलेल्या सरकारनं लगेच बोनस जाहीर केला असा टोलाही लगावला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत साधारण ११ महिने मी धरलेला विषय रस्त्याचा घोटाळा, मेगा रोड स्कॅम मी जानेवारीत समोर आणला होता. घटनाबाह्य मुख्यमंत्री खोटं बोलतायत रस्त्यांबद्दल, ५००० कोटींचे कंत्राट दिले, रद्द केले मग ते पुन्हा ६००० कोटींनी वाढवले. ॲडव्हान्स मोबलायझेशन आणि मुख्यमंत्र्यांच्या मित्रांना फायदा होईल हे पाहिलं गेलं. पत्रकार परिषदेमुळे सव्वा सहाशे कोटी फायदा होणार होता त्यांनी तो रद्द केला गेला. मुंबईचे हजार कोटी तिथे आपण वाचवले असल्याचेही सांगितले.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, पावसाळ्यानंतर जी कामं सुरू होणं अपेक्षित आहे. कुठेही काम दिसत नाही. रस्त्याची कामं व्हायला हवी तशी सुरु झाली नाहीत. ५० रस्तेही पूर्ण करू शकले नाहीत. कालच्या ट्वीटनंतर टर्मिनेशनची नोट काढली होती. आम्हीही बोलू शकलो असतो की विजय झाला आमचा. २५ वर्षाचा अनुभव आहे. आम्हाला हे कसं चालवायचं हे ठाऊक आहे. आयुक्तांनी फक्त मुख्यमंत्र्यांना घोटाळ्यांमध्ये मदत करणं हे योग्य नाही. तुम्ही मुंबई जाणून घ्यायची गरज आहे अशी टीकाही केली.

आदित्य ठाकरे यांनी सवाल करताना म्हणाले की, मुंबईत कामं होणार कधी..? पुढच्या पावसाळ्यात सुद्धा त्याच ठिकाणी दिसतील… BMC MHADA BPT RAILWAY यांच्यासोबत कामं न करता आज कुछ तुफानी करते है केलं. कंत्राटदारांशी माझं काही वाईट नाही पण कामं त्यांनीच करणं गरजेचंय. उपनगरातले कंत्राटदार आज मुख्यमंत्र्यांचं काही नातं आहे का पाहा.. चिपळूणमध्ये कोसळलेला पूल याचं कनेक्शन पाहा. काही चौकशी झालीय की नाही कळेल असेही स्पष्ट केले.

मुंबईतल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईचा जबाबदार आमदार म्हणून मला प्रशासकांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी न्यावं आणि दाखवावं. आमचं सरकार येतंच आहे, सर्वांना ठाऊक आहे. आम्ही आलो की घोटाळेबाजांना सोडणार नाहीं… मविआचं सरकार येऊ दे, मुंबईला लुटू देणार नाही असा इशारा देत खोके सरकारला जनता घालवल्याशिवाय राहणार नाही. हिंमत असेल तर या सरकारचा पाठिंबा काढा असे आव्हान भाजपाला दिले.

तसेच आदित्य ठाकरे म्हणाले, आमचं काम लोकांसमोर आहे. पेनल्टी घेणार ती पालिकेचं पेमेंट झाल्यावर लावणार. यावर आयुक्त बोलणार की नाहीत. प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आहे, मुंबईत धुळीचा त्रास वाढलाय. आम्ही सतत प्रयत्न केले, अर्बन फोरेस्ट रामसार साईट हे सगळं खोके सरकार आल्यावर बंद झालं, पर्यावरण मंत्री म्हणून कुणी उत्तर दिलंय का? आयुक्त कारणं देतायत ती खोटी आहेत. स्पष्ट कारण हेच आहे बांधकाम. बांधकामाची ही धूळ लोकांना त्रास देतेयत. कामं आधी अशीच होती, पण आज आधीसारखं नियंत्रण होत नाही. मुंबईच जिथं कामं सुरूय तिथं स्प्रिंकलर हिरवं कापड आहे का दाखवा असा सवाल करत मग स्मॉग आला की तेच नियम सांगतात. पालकमंत्रीच एक बिल्डर आहेत तर काय अपेक्षा करणार असा टोलाही लगावला.

आदित्य ठाकरे म्हणाले, बीकेसीत कुठेही हिरवं कापड दिसलंय का पाहा, हजार टॅंकर घेऊन रस्ते धुवायचे. हे सोल्यूशन नाही. बांधकामावर नियंत्रण आणा. हे हजार टॅंकरमध्ये पाणी आणणार कुठून? पाणी तुमचंच राज्यात पाणी टंचाई आहे. रस्त्यावर पाणी टाकून प्रदूषणावर नियंत्रण मिळवणं हास्यास्पद आहे. लोकांनी फोटो काढून पालिकेला टॅग करा ट्वीट करा, श्रेयवादासाठी ते प्रयत्न करतात. राममंदिरासाठीही तेच केलं. पण हे पाहायला पाहिजे पक्ष फोडला कुणी? आज मुंबईत रस्ते होणार की नाही? प्रदूषणावर नियंत्रण मिळवणार की नाही? दंड लावतायत पण तो घेणार कधी? अशी प्रश्नांची सरबतीही केली.

बांधकाम प्रश्नावर शिंदे सरकारला घेरताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवाजी पार्कमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग स्प्रिंकलर सरकार कोसळल्यानंतर कुणी चालवलं की नाही. मेंटेनम्स ही करायचा असतो. कंत्राटदारांची धमाल चाललीय असा आरोप करत, हे स्मॉग टॉवर्स मी मंत्री असतानाही हा विषय आला होता, पण त्यानं जनतेला काही फायदा होणार नाही. जे नियम पाळत नाही त्या बांधकामांवर नियंत्रण आणणं गरजेचं असल्याचं मतही मांडले.

सदा सरवणकर यांचे नाव न घेता आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या राज्यात सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासावर एक असा माणूस बसवला, जो गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक दाखवतात अशा सरकारकडून काय अपेक्षा करणार? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारच ना गद्दार असले तरी ते आमदार आहेत हा दुसरा जनरल डायर आणून बसवलाय न्यासावर अशी टीकाही केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *