Breaking News

शरद पवार यांचे मिश्किल विधान, कोणत्याही घटनेमागे फक्त एकाच व्यक्तीचे नाव पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगले झाले राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली गेली

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अडीच तीन वर्षापूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधी मागे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे विधान केले. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण अजित पवार यांच्याबरोबर शपथ घेतली होती, असे विधान केले. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर सुरुवातीला शरद पवार यांनी अडीच-तीन वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचे आता काय असे सांगत फडणवीस यांच्या दाव्याची खिल्ली उडविली.

त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा पवार यांच्याशी चर्चेनंतरच शपथविधी घेतल्याचे सांगत हवे वेळ आली की उरलेलं सत्य सांगेन असे सांगत राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता ते मिश्किलपणे म्हणाले, महाराष्ट्रातील कोणत्याही घटनेमागे एकाच व्यक्तीचे नाव असल्याचे बोलले जाते असे सांगत सगळ्या राजकिय नेत्याचा रोख शरद पवार यांच्याकडेच असतो असे स्पष्ट केले. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर स्वत: शरद पवार यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा केली होती, या देवेंद्र फडणवीसांच्या विधानाबद्दल विचारलं असता शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. इथं काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव पुढं येतं, मग लातूरमध्ये एखादा भूकंप झाला तर तिथेही याच व्यक्तीचं नाव येतं…” शरद पवारांचा बोलण्याचा रोख स्वत:कडेच होता. या टिप्पणीनंतर उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.

पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. शरद पवार यांनी पहिल्यांदाच हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून २३ नोव्हेंबर २०१९ ला झालेला पहाटेचा शपथविधी चांगलाच चर्चेत आहे. या सगळ्याची शरद पवार यांना कल्पना होती, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र ते असत्य असल्याचं शरद पवार म्हणाले होते.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *