Breaking News

राज्य सरकारीसह राज्यातील ‘या’ विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन

काही दिवसांपू्र्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्याना दिवाळीचा अग्रिम देण्याचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना खुषखबर दिली. त्यानंतर आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जावी याकरिता दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्य सरकारीसह शिक्षक, जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी आणि अकृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे वेतनही दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आली.

येत्या २२ तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी २२ ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल. या सर्व कर्मचाऱ्यांनाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीपूर्वी वेतन मिळणार आहे.
वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *