Breaking News

नाना पटोलेंची अंतर्गत टीम तयार नवनियुक्त पदाधिका-यांकडे सोपविल्या जबाबदा-या काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे, तर मिडिया कम्युनिकेशन जाकिर अहमद यांच्याकडे

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची व डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसुत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची रचना करून नवनियुक्त पदाधिका-यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. माध्यम आणि संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अतुल लोंढे यांच्याकडे सोपवण्यात आली असून सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही या समितीत समावेश आहे.

मा. अध्यक्ष व मान्यवरांच्या दौ-याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

आघाडी संघटना, विभाग व सेल या विभागाच्या प्रमुखपदी माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर हे सहप्रमुख असतील. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आ. अभिजीत वंजारी हे सहप्रमुख व प्रदेश सरचिटणीस माजी आ. दिप्ती चवधरी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सहप्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवर, सहप्रमुखपदी, शाम उमाळकर, संजय बालगुडे, यांची व सदस्यपदी डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजकीय कार्यक्रमाच्या नियोजन समिती प्रमुखपदी माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, सदस्यपदी सुर्यकांत पाटील व प्रशांत गावंडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

बुथ विस्तार समितीच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे,  सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष हरिष पवार, सदस्यपदी प्रदेश सचिव सचिन साठे व नंदा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

विनोद तावडे यांचा टीका, संविधान ८० वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा…

गोव्यातल्या काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी केली आहे, तर कर्नाटकातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *