Breaking News

मुंब्र्यातील शाखेच्या मालकीवरून उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाने दाखविले काळे झेंडे शिंदे गटाने अखेर मुंब्र्यातील शिवसेना शाखेची जागा बळकाविली

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा येथील शिवसेना शाखेच्या इमारतीवर ठाणे महापालिकेने बुलढोझर फिरवित ठाकरे गटाच्या ताब्यातील जागा हिसकावून घेतल्याचे चित्र आज निर्माण झाले. ठाणे महापालिकेच्या कारवाईनंतर ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संबधित शाखेच्या जागेची पाहणी करण्यासाठी मुंब्रा येथे गेले. पण शिंदे समर्थक शिवसैनिकांही उद्धव ठाकरे यांना त्या जागेवर पोहचू द्यायचे नाही असा निश्चिय करत मोठ्या प्रमाणावर समर्थक जमले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्या वादग्रस्त जागेची पाहणी पोलिसांच्या विनंतीमुळे दूरूनच करावी लागली. दरम्यानच्या काळात शिंदे गटाच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांना काळ झेंडे दाखवित निषेध केला.

उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार असल्याचे कळताच शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर आज दिवाळीचा सण असतानाही जमा केले. तसेच ज्या व्यक्तीच्या नावावर जागा होती, त्या जागेच्या भाडेवसुलीधारकाला शिंदे गटाने आपल्या सोबत ठेवले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे अनेक बॅनर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फाडले असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला.

तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांचे बुलढोझरमधून फुले टाकत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वागत केले. त्यानंतर वादग्रस्त शाखेच्या जागेकडे उद्धव ठाकरे यांचा ताफा निघाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला शाखेच्या मार्गाकडे जाण्यास मनाई केली. नंतर शाखेच्या दिशेने जाण्यास मान्यता दिली. त्यानंतर शाखा असलेल्या परिसरात ठाकरे यांचे समर्थक असलेल्या बाजूला आणि शिंदे समर्थक असलेल्या शिवसैनिकांच्या असे दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकॅड्स लावले. तत्पूर्वी शिवसेना शाखा असलेल्या जागेच्या इमारतीच्या ठिकाणी शिंदे गटाने कंटेनर लावून त्या ठिकाणी शाखेचे कामकाज सुरू केले.

उद्धव ठाकरे हे शाखेच्या जागेच्या जवळ पोहोचल्यानंतर बॅरिकॅड्सच्या पलिकडे जाण्यास पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना मनाई केली. यावेळी ठाकरे गटाचे समर्थक आणि नेतेही मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे चित्र पाह्यला मिळत होते. तर दुसऱ्याबाजूला शिंदे समर्थक शिवसैनिक आणि नरेश मस्के हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत काळे झेंडे दाखवित होते.

उद्धव ठाकरे यांना पोलिस प्रशासनाने बॅरिकॅड्सच्या पलिकडे न जाण्यास विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिस प्रशासनाला सवाल केला की, तिथे जो कंटेनर ठेवला तो काय तुमची परवानगी घेऊन ठेवलाय? तुम्ही बॅरिकॅडस् काढा मला त्या जागेपर्यंत जाऊ द्या अशी भूमिका घेतली. त्यावर पोलिस अधिकारी म्हणाले की, तुमची गाडी तिकडे गेल्यास आणखी तणाव निर्माण होईल. त्यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊत, संजय राऊत यांनीही पोलिसांकडे जागेच्या ठिकाणाची पाहणी करण्याची आग्रही मागणी केली.

पण पोलिसांनी बॅरिकॅड्स हटविण्यास असमर्थता दर्शवित तेथूनच जागेची पाहणी करा अशी विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गाडीतून उतरून बॅरिकॅड्स पासूनच जागेची पाहणी केली. अन् त्यानंतर त्यांचा ताफा माघारी निघाला.

त्यानंतर शिवसैनिकांशी संवाद करताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातले गद्दारांचे सरकाराने तिकडे खोके घेऊन इकडे खोके आणून ठेवले आहे. हे खोके हटविण्यासाठी मी स्वतः बुलढोझोर घेऊन आलो आहे. पोलिस बाजूला सारा आणि समोर या बघु या तुमच्यात किती हिम्मत आहे ते असे खुले आव्हान देत लवकरच तिथले खोके उचलून न्या नाहीतर आम्ही ते खोके उलचून फेकल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही शिंदे गटाला दिला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, उद्यापासून आम्ही सर्वजण आमचे शिवसैनिक त्या चौकात जाऊन बसतील आणि तेथून शाखेचे कामकाज करतील, असे सांगत महापालिकेपासून ते लोकसभा निवडणूकीपर्यंत आणि प्रत्येक निवडणूकीत गद्दारांना त्यांचे डिपॉझिट जप्त करून त्यांना घरी पाठवायचेच असे आवाहन करत तुम्ही आग्या मोहोळवर दगड मारलाय आता त्या कुठे डसतील ते तुम्हालाही कळणार नाही असा गर्भित इशाराही शिंदे गटाला दिला.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *