Breaking News

एकनाथ खडसे यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार एअर अॅब्युलन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले

एकेकाळचे राज्याचे भाजपाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आणि आताचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी छातीत त्रास सुरु झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे नेमक्या त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने खडसेंना पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यासाठी एअर अॅब्युलन्स उपलब्ध करून दिली. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे दूरध्वनी आणि ट्विटच्या माध्यमातून आभार मानले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना छातीचा त्रास सुरु झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. नेमके त्याच कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुट्टीसाठी त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या तापोळा या गावी होते. एकनाथ खडसे यांना होत असलेल्या त्रासाची माहिती तातडीने समजताच तेथूनच एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देत त्यांच्यावर पुढील उपचारासाठी मुंबईला आणण्याची व्यवस्थाही केली.

आता एकनाथ खडसे यांनी त्यांच्या तब्येतीला आराम मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी दिवाळीचे निमित्त साधत फोनवरून केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच दिवाळी निमित्त शुभेच्छाही दिल्या.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *