Breaking News

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या कोकणात ७४ गाड्या, आरक्षण ‘या’ तारखेपासून रेल्वे विभागाने जारी केली माहिती

जून महिना संपूर्ण पावसाविना गेला. तर ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र मागील दोन दिवसांपासून कोकणसह राज्यातील काही भागात पाऊसाने चांगली हजेरी लावलेली दिसत आहे. तशातच पुढील महिन्यात शेवटच्या आठवड्यात गणरायाचे आगमन होत असल्याने मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अडचण होवू नये म्हणून मध्य रेल्वेकडून कोकणसाठी ७४ रेल्वे फेऱ्या सोडण्याचा निर्णय जाहिर केला आहे.

यंदा गणेशोत्सवनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी मध्य रेल्वेने ७४ विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर येथून सावंतवाडी, कुडाळ, मडगांवसाठी या गाड्या धावण्यात येणार आहेत. या गाड्यांचे तिकीट आरक्षण ४ जुलैपासून सुरु होणार आहे.

ऑगस्ट अखेरीस गणेशोत्सव सुरू होणार आहे. दोन वर्षे करोनामुळे गणेशोत्सवाचा उत्साह काहिसा कमी होता. यंदा मात्र निर्बंध नसल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी अधिक असण्याची शक्यता आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे गेल्या महिन्यातच बंद झाले. त्यामुळे आता रेल्वेने अधिक गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

१. मुंबई – सावंतवाडी दररोज  विशेष फेरी (एकूण ४४ फेऱ्या)

०११३७  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर पर्यंत दररोज मध्यरात्री  १२ वाजून.२० मिनिटांनी सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दुपारी २ वाजता  पोहोचेल.

तर गाडी क्रमांक ०११३८ सावंतवाडी रोड येथून  २१ ऑगस्ट  ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी २.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता पोहोचेल. २. नागपूर – मडगाव द्विसाप्ताहिक विशेष फेरी (१२ फेऱ्या).

Check Also

राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, जी टीका केली ती ४० आमदार फोडले म्हणून…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच जाहिर सभा घेत राज्यातील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *