Breaking News

कडेकोट बंदोबस्तात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदार मुंबईत दाखल बंडखोर आमदार आणि भाजपा आमदारांची संयुक्त बैठक होणार हॉटेलमध्ये

शिवसेनेतील ३९ आमदारांना सोबत घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा एकनाथ शिंदे यांनी फडकाविला. त्यानंतर या आमदारांना सूरत मार्गे गुवाहाटीला नेले. तेथून ७ दिवस पूर्ण झाल्यानंतर मागील चार दिवसांपासून गोव्यातील हॉटेलमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर आज या सर्व बंडखोर आमदारांना सोबत घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले. मात्र या आमदारांना कफ परेड येथील ताज प्रेसिडन्सी येथील हॉटेल येथे आणण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव सांताक्रुज विमानतळ ते या हॉटेल दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शनिवार आणि रविवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. यातील उद्या रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. तर रविवारी विश्वासदर्शक ठराव मांडून नव्या शिंदे-फडणवीस सरकार बहुमत सिध्द करणार आहे. त्यासाठी या आमदारांना मुंबईत आणणे गरजेचे होते. त्यामुळे या आमदारांना गोव्यातून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: गेले आणि सोबत घेवून आले.

तब्बल अकरा दिवसांच्या प्रवासानंतर हे सर्व आमदार अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदेसह ३९ बंडखोर आमदार काही वेळापूर्वी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. विमानतळावरून या आमदारांना हॉटेलपर्यत पोहोचविण्यासाठी पाच ट्रॅव्हल्सच्या गाड्या करण्यात आल्या होत्या. या गाड्यातून सर्व आमदारांना आणण्यात आले. हॉटेलपर्यतच्या प्रवासा दरम्यान रस्त्याने पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

मुंबईत दाखल होताच मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची संयुक्त बैठक पार पडत आहेत. या बैठकीला एकनाथ शिंदेसह सर्व बंडखोर आमदार उपस्थित आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवली जाणार आहे.

ज्या हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे, येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. हॉटेलमध्ये केवळ आमदारांनाच प्रवेश देण्यात येत आहे. आमदारांची सुरक्षाव्यवस्था आणि पीए यांना देखील बाहेर थांबवण्यात येत आहे. संबंधित बैठकीत नेमके कोणते निर्णय होतात? याकडे सर्वाचं लक्ष लागलं असून अध्यक्षपदाची निवडणूक ही भाजपा आणि शिंदे गटाची पहिली परीक्षा ठरणार आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *