Breaking News

पंतप्रधान मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा किस्सा सांगत दगडूशेठ हलवाई गणपतीची आठवण डॉ दिपक टिळक यांच्या हस्ते टिळक पुरस्कार सोहळा संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज १ ऑगस्ट पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि टिळक स्मारक समितीच्या डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांविषयी माहिती सांगितली. तसेच इतिहासातील अनेक घटनांचा उल्लेख केला. जरी नरेंद्र मोदी यांनी हिंदीत भाषण केलेले असले तरी महाराष्ट्रातील महापुरुषांचा संदर्भ मराठी भाषेतून दिला.

खास या पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले असले तरी त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. तिथे अभिषेकही केला. तसेच पुरस्कार प्रदान केल्यानंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आणि दगडूशेठ यांचा उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकमान्य टिळक हे संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत. महाराष्ट्रातील लोकांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. महाराष्ट्रातील लोकांप्रमाणेच गुजरातमधील लोकांचंही लोकमान्य टिळकांशी खास नातं आहे. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात लोकमान्य टिळक दीड महिने अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात कैद होते. तसेच ते १९१६ मध्ये अहमदाबादला आले होते. तुम्हाला ऐकून आनंद होईल की, इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या काळातही लोकमान्य टिळकांच्या स्वागतासाठी त्या काळात ४० हजारांहून अधिक लोक जमले होते. त्यांचं भाषण ऐकायला तिथल्या प्रेक्षकांमध्ये सरदार वल्लभभाई पटेलही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, त्यावेळी लोकमान्य टिळकांनी अहमदाबादमध्ये केलेल्या भाषणाची सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर वेगळी छाप पडली. त्यानंतर काही वर्षांनी सरदार पटेल जेव्हा अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. पटेलांनी अहमदाबादेत टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. सरदारांनी त्यासाठी जागा कुठली निवडली बघा. त्यांनी अहमदाबादेतल्या व्हिक्टोरिया गार्डनची निवड केली. हे उद्यान इंग्रजांसाठी खूप खास होतं. कारण, इंग्रजांनी राणी व्हिक्टोरियाची हिरक जयंती साजरी करण्यासाठी अहमदाबादेत १८९७ साली हे उद्यान बांधलं होतं. ब्रिटीश महाराणीच्या नावाने बनवलेल्या उद्यानात इंग्रजांच्या छातीवर सरदार पटेल यांनी देशातल्या इतक्या मोठ्या क्रातिंकारकाचा पुतळा म्हणजेच टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी व्हिक्टोरिया गार्डनमध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पण सरदार तर सरदार होते. त्यांनी सांगितलं, मी राजीनामा देऊन माझं पद सोडेन, पण पुतळा तर तिथेच बसवला जाईल. त्यानंतर १९२९ मध्ये महात्मा गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं. अहमदाबादेत असताना मी अनेकदा तिथे गेलो आहे. अनेकदा त्या मूर्तीचं दर्शन घेतलं आहे.

खास या पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले असले तरी त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. तिथे अभिषेकही केला. तसेच पुरस्कार प्रदान केल्यानंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आणि दगडूशेठ यांचा उल्लेख केला.

नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात एखादं भाषण करतात, तेव्हा त्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतात. आजही त्यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आज लोकशाहीर आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने त्यांनाही पंतप्रधानांनी अभिवादन केलं.

भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले, मी इथे येण्याआधी पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन गणपतीचे आशीर्वाद घेतले. हे मंदिर पुणे जिल्ह्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. दगडूशेठ हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग नोंदवला आणि सार्वजनिकरित्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मी या पावन भूमीला आणि या भूमीत जन्माला आलेल्या विभूतींना नमन करतो.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे १८ व्या शतकातले पुण्यातले सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातल्या बुधवार पेठ भागात असलेलं दत्त मंदिर भागात त्यांचं वास्तव्य होतं. प्लेगच्या साथीत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचं निधन झालं. या घटनेमुळे दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दोघेही दुःखी झाले. त्यावेळी माधवनाथ नावाचे महाराज होते त्यांनी या दोघांचं सांत्वन केलं आणि त्यांना सांगितलं की आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि त्याची रोज पूजा करा. त्यानंतर तयार झाली ती दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली.

१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. १८९६ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव सुरु झाला. नंतरच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं निधन झालं. मात्र त्यांनी सुरु केलेली गणेश उत्सवाची परंपरा कायम राहिली.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *