Breaking News

व्यावसायिक गॅस झाला १०० रूपयाने स्वस्त जेवण आणि नास्ता स्वस्त होण्याची शक्यता

सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ९९.७५ रुपयांनी कमी केली आहे. आजपासून नवे दर लागू होणार आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर १६८० रुपयांना मिळेल, जो पूर्वी १७८० रुपयांना मिळत होता.

कोलकातामध्ये, हे १८०२.५० रुपयांना उपलब्ध होईल, जे आधी १८९५.५० रुपयांना उपलब्ध होते. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हे १६४०.५० रुपयांना उपलब्ध असेल. यापूर्वी त्याची किंमत १७३३.५० रुपये होती. चेन्नईमध्ये त्याची किंमत रु. १८५२.५० (रु. ९२.५० च्या कपातीसह) खाली आली आहे. पूर्वी ते १९४५ रुपयांना उपलब्ध होते.

विशेष म्हणजे कोलकाता आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ९३ रुपयांनी कमी झाली आहे. यापूर्वी ४ जुलै रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ७ रुपयांची किरकोळ वाढ झाली होती.

Check Also

अखेर ‘या’ कारणामुळे रिझर्व्ह बँकेने घेतल्या २ हजारच्या नोटा चलनातून मागे मार्च २०२३ अखेर फक्त १० टक्के नोटा चलनीय बाजारातः ३० सप्टेंबर अखेरपर्यंत बँकेत कराव्या लागणार जमा

२०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचे कंबरडे मोडायचे असल्याचे सांगत अचानकच देशातील एक हजार, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *