Breaking News

शरद पवार यांनी मारलेल्या थापेची पुनःरावृत्ती नरेंद्र मोदी यांच्याकडून अजित पवार यांच्यासोबत… पुण्यात टिळक पुरस्कार वितरणानंतर आधी शरद पवार यांनी तर नंतर मोदींनी अजित पवार यांना मारली प्रेमाची थाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल शरद पवार यांनी आनंदही व्यक्त केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकमान्य टिळक यांची महती सांगणारं एक भाषण केलं. या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सदस्य, मंचावर उपस्थित असलेले शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी गंमतीने नरेंद्र मोदी यांच्या दंडावर थार मारली तर अजित पवार आणि पंतप्रधान मोदी जेव्हा समोरा समोर आले तेव्हा त्याच घटनेची पुर्नरावृत्ती घडल्याचा प्रसंग चर्चेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिळक संस्थानचे प्रमुख डॉ दिपक टिळक यांची आणि नंतर शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यावेळी काही वेळापुरता शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात प्रेमळ संवाद पार पडल्याचे दिसून आले. यावेळी शरद पवार यांनी मोदींच्या दंडावर प्रेमाने थाप मारल्याचे दिसून आले. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले. त्यांच्याशीही त्यांनी हात मिळवला. पुढे गेल्यानंतर जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समोरासमोर आले तेव्हा त्यांनी अजित पवारांशी हात तर मिळवलाच शिवाय त्यांच्या हातावर हलकेच थोपटलं. त्यानंतर अजित पवार यांनी सूचक हास्यही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर वळले आणि पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले.

त्यामुळे शरद पवार यांनी मारलेल्या प्रेमळ थापेची पुर्नरावृत्ती अजित पवार यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांनी केले. त्यामुळे शरद पवार यांच्या थापेची अजित पवार यांना परतफेड केल्याचे दिसून आले. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून २ जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची महाराष्ट्रात ही पहिलीच भेट झाली. जाहीर कार्यक्रमात हे दोघं पहिल्यांदाच समोर आल्याचं दिसलं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना अशा प्रकारे थोपटणं आणि त्यानंतर अजित पवार यांनी स्मित हास्य करणं याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. व्हिडीओत आणि फोटोत ही बाब कैद झाली आहे. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य आहे हे दिसून येतं आहे. ही पुढे येणाऱ्या नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी ११ वाजता पुण्यात पोहचले. त्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली. त्यानंतर अभिषेक आणि आरतीही केली. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरस्कार कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमातलं भाषण केल्यानंतर सगळ्यांना जाताना जे अभिवादन केलं त्यात अजित पवारांना केलेलं अभिवादन काहीसं वेगळं होतं ज्याची चर्चा होत आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना पुरस्कार वितरण केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा अप्रत्यक्ष संदर्भ देत म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक केल्याची चर्चा आता होत आहे. पण देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी केल्याचे सांगत त्यावेळी लाल महालात लपून राहिलेल्या शाहीस्तेखानाची बोटं सर्जिकल स्ट्राईकमध्ये तो़डल्याची आठवणही सांगितली.
तसेच शरद पवार यांनी यंदाचा टिळक पुरस्कार नरेंद्र मोदी यांना जाहिर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *