Breaking News

मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय वैद्यकीय कारणास्तव सर्जरी करण्यासाठी केला पीएलएमए न्यायालयात जामीन अर्ज

२० वर्षापूर्वी केलेल्या जमीन खरेदी व्यवहारात अंडरवर्ल्डशी संबधित असलेल्या लोकांचे संबध उघड झाल्याने सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन मिळावा यासाठी पीएलएमए न्यायालयात अर्ज केला. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे.
ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात हेबॅसिस कार्पस याचिका दाखल करत दाद मागितली होती. मात्र न्यायालयाने मलिक यांचे म्हणणे ऐकून घेत या प्रकरणी अर्धवट सुनावणी घेवून निर्णय घेण्यापेक्षा पूर्ण याचिका ऐकून घेतल्यानंतर निर्णय देता येईल असे सांगत मलिक यांची याचिका फेटाळून लावली.
त्यानंतर मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात विरोधात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही मलिक यांना दिलासा दिला नाही. दरम्यान नवाब मलिक यांनी त्यांच्यावरील वैद्यकीय उपचारासाठी आणि खासगी रूग्णालयात एक शस्त्रक्रिया करण्यासाठी तात्पुरता जामीन मिळावा म्हणून आज ईडीच्या विशेष न्यायालयात अर्ज केला.
मात्र त्यावर पीएमएलए न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नसला तरी त्यांनी केलेल्या याचिकेवर सोमवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणात मलिकांना अटक केली?
साधारणतः २० वर्षापूर्वी नवाब मलिक यांनी कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड येथील तीन एकर जमिन नाममात्र दरात खरेदी केली. मात्र या जमिनीची खरेदी करताना मलिक यांनी मध्यस्थ हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या हस्तकाशी व्यवहार केला. त्यासबरोबहर दाऊदची बहिण हसिना पारकर हिलाही पैसे दिल्याचा आरोप ईडीने मलिक यांच्यावर ठेवला आहे.
विशेष म्हणजे एऩआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहीमच्या विरोधात नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपास ईडीकडूनही सुरु झाल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. ईडीने नवाब मलिक यांच्या विरोधात पाच हजार पानांचे आरोप पत्र ठेवले आहे.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *