Breaking News

महाराष्ट्रात “सत्तेचे भोगी” म्हणत राज ठाकरेंनी केले “योगी आदित्यनाथां”चे अभिनंदन भोंगे उतरविल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक

जवळपास २० दिवसांहून अधिक काळ मनसेने राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यावरून आक्रमक पवित्रा घेत भोंगे उतरवा नाही तर मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. मात्र त्यानंतर टीका-टीपण्णीला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळावरील भोंगे उतरविल्याबद्दल राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले. मात्र योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करताना मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाना साधायला विसरले नाही.
देशभरातील जवळपास १९ ठिकाणी राम नवमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हिंसाचाराची प्रकरणे घडली. त्यानंतर उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी धार्मिकस्थळावरील अर्था मंदिरे आणि मस्जिदींवरील अनिधकृत भोंगे हटविण्याचे आदेश देत त्याची अंमलबजावणी वेळी एकट्या लखनौमध्ये ७०० मस्जिदीवरिल भोंगे तर जवळपास १४०० मंदिरांवरील भोंगे उतरविण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या याच कृत्याची वाहवा करत धार्मिकस्थळावरील, विशेषतः मशिंदीवरील भोंगे उतरविल्याबद्दल योगी सरकारचे अभिनंदन आणि आभार असे सांगत त्यांनी आदित्य योगींचे अभिनंदन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अभिनंदन करत आमच्याकडे महाराष्ट्रात एकही योगी नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी भोंगे उतरविताना हिंदूंची मंदिरे असतील किंवा मशिदींवरील भोंगे असतील याबाबत कोणताही दुजाभाव केला नाही. भोंगे उतरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणीही केली. मात्र राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळांचा उल्लेख केलेला असला तरी मशिंदीवरील भोंगे असा खास उल्लेख करत उतरविण्यावरून त्यांनी योगींचे अभिनंदन केले.
त्यामुळे राज ठाकरे यांच्या निशाण्यावर फक्त मशिदीच असल्याचे दिसून येत असून मंदिरावरील भोंगेबाबत त्यांनी संदिग्ध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Check Also

राहुल गांधी यांचा रायबरेलीतूनही अर्ज दाखल, तर अमेठीतून के एल शर्मा

यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या काही दिवस आधी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून यावेळी उमेदवारी अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *