Breaking News

म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील घरांचे लाईटबील भाडेकरूंच्या नावावर होणार म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई: प्रतिनिधी
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमधील विद्युत मीटर उपअभियंता किंवा मिळकत व्यवस्थापक यांच्या नावे न घेता संबंधीत पात्र गाळेधारकाच्या नावे घेण्यात यावे. तसेच सध्या मंडळाच्या नावे असणारी विद्युत मीटर तात्काळ संबंधीत पात्र भाडेकरूंच्या नावे करण्याची कार्यवाही करावी असे आदेश महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी परिपत्रकाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे त्या त्या संबधित राहणाऱ्या घरातील व्यक्तींच्या नावे राहत्या घराचे लाईटबील नावे होणार आहे.
म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वितरण ताबा पत्र गाळेधारकाला मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी (संक्रमण शिबीर गाळे) यांच्या कार्यालयामार्फत केली जाते. संबधित गाळेधारकाच्या नावे विद्युत मीटर बसविण्यासाठी वा गाळेधारकाच्या नावावर करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देताना संबंधीत गाळेधारकाच्या पात्रतेबाबतचे पुरावे , चालू महिन्याच्या सेवा शुल्क भरल्याची ताबा पावती , वितरण आदेश, व्हेकेशन नोटीस व तत्सम बाबी यांची पडताळणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे किंवा इतर विभागीय मंडळातर्फे विक्रीसाठी सदनिका बांधल्या जातात. सदनिकांमध्ये वीजेचे मीटर सध्याच्या पद्धतीप्रमाणे उप अभियंता यांच्या नावे घेतले जातात. तथापि असे आढळून आले आहे की, लाभार्थींनी विजेची बिले न भरल्यामुळे वीजेच्या देयकांची वसुली वीज मंडळ ‘म्हाडा’कडून करते. सदरची पद्धत ही अयोग्य आहे. अशा प्रकारे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत बांधलेल्या पुनर्रचित इमारतींमध्ये किंवा संक्रमण शिबिरांमध्ये वीजेचे मीटर उपअभियंता यांच्या नावे घेतले जातात. यापुढे या परिपत्रकातील आदेशाप्रमाणे ही कार्यवाही करावी असे त्यांनी परिपत्रकान्वये आदेश दिले.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *