Breaking News

Tag Archives: mhada

मुंबईतील म्हाडा इमारतीत राहणाऱ्या ५० हजार रहिवाशांना दिलासा

म्हाडाच्या ५६ वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०२१ या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे ३८०.४१ कोटींचे वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील ५० हजार सदनिकाधारांना दिलासा मिळाला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री अतुल सावे …

Read More »

कायमस्वरूपी संक्रमण शिबिरातील सदनिका प्रकल्पबाधितांकरिता देण्याबाबत मार्ग काढू

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील (एसआरए) बाधितांसाठी कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांची (पीटीसी) आवश्यकता असते. एमएमआरडीए, महानगरपालिका आदी यंत्रणांच्या विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांसाठी (पीएपी) देखील सदनिकांची आवश्यकता आहे. तथापि एसआरएला संक्रमण शिबिरांची आवश्यकता असल्याने यामधील सदनिका प्रकल्पबाधित शिबिरामध्ये रुपांतरित करून देण्याबाबत लवकरच बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे …

Read More »

अतुल सावे यांची घोषणा, परवडणाऱ्या घरांसाठी लवकरच नवीन धोरण

राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी नुकतीच केली. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) च्यावतीने बांद्रा-कुर्ला संकुल मध्ये …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांची लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत

मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरीता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत …

Read More »

म्हाडा प्राधिकरणांतर्गत इमारत पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर म्हाडा प्राधिकरण अन्यथा शासनामार्फत पुढील अधिवेशनात तरतूद करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, पात्र गिरणी कामगारांसाठी घरकुलांची निर्मिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित

गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करून पात्र कामगारांना घरे देण्यासाठी शासनामार्फत जे निर्णय घेणे आवश्यक असेल ते घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण …

Read More »

निर्णय कोणासाठी? मालकी म्हाडाच्या मुंबई मंडळाची पण पुनर्विकासाची परवानगी आरआर बोर्डाची

मुंबईतील म्हाडाच्या अखत्यारीत असलेल्या मुंबई गृहनिर्माण मंडळ, मुंबई दुरूस्ती व पुर्नरचना मंडळ आणि झोपडपट्टी सुधार मंडळाच्या एकेका कारभाराचे किस्से एकूण अचंबित व्हायला होते. गरजेपेक्षा एफएसआय वापरणे किंवा दुसऱ्या एका जागेचा एफएसआय भलत्याच प्रकल्पाला वापरणे सारखी धक्कादायक प्रकरणी अनेकवेळा बाहेर आली. मात्र यातच आता नवी एका प्रकरणाची भर त्यात पडली असून …

Read More »

म्हाडाला द्यायचे होते ९८ हजार चौ. फु. जागेचे बांधकामः पण मिळाले ४० हजार चौ.फुट चटई निर्देशांक घोटाळ्यात म्हाडाला १४५ कोटी रूपयांचा विकासकाकडून चुना

दादर येथील लोकमान्य नगर प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात राज्य सरकार आणि पर्यावरण खात्याने निर्धारीत केलेल्या सरप्लस अर्थात अतिरिक्त जागेसह चटई निर्देशांक क्षेत्रफळाचे जवळपास ९८ हजार चौ.फुटाचे बांधकाम देणे अपेक्षित असताना विकासकाने अवघ्या ४० हजार चौ.फुटाचे बांधकाम म्हाडाला हस्तांतरीत केल्याने आणि त्याकडे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तब्बल १४५ कोटी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश,… तर मुंबईतील विकासकांवर कारवाई करा दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या ५६ प्रकल्पांसाठी नोडल अधिकारी नियुक्त

मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध पर्याय तपासण्यात यावे. प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना …

Read More »

उपकार प्राप्त इमारतींचा वाढीव सेवाशुल्क कर रद्दः २० हजार कुटुंबियांना होणार लाभ २५० रुपयेच घेणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबईतील म्हाडाच्या उपकार प्राप्त इमारतींना महिन्याला आकारण्यात येणारे वाढीव सेवाशुल्क रुपये ६६५.५० रद्द करुन जुन्या दराने २५०/- रुपयेच आकारण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी विचारेल्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. तसेच या इमारती धोकादायक झाल्या …

Read More »