Breaking News

वाईन शॉप्सवाले म्हणतात किमान ३ हजाराचे मद्यप्रेम दाखवा तरच मिळेल प्रेम दाखविण्याच्या पध्दतीमुळे तळीराम संतप्त

मुंबई: प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेने मद्यप्रेमींसाठी आणि राज्यातील महसूलातील भर वाढविण्यासाठी सोमवारपासून वाईन्स शॉप्स (मद्यविक्रीची दुकाने) सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या दुकानदारांनी किमान ३ हजार रूपयांची खरेदी करत असाल तरच तुम्हाला मदीरा घेता येईल अशी अट घातल्याने मद्यप्रेमींना घातल्याने तळीरामांनाकडून प्रचंड संताप व्यक्त होत असून या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने बंद करण्यात आलेल्या मद्यविक्रीला पुन्हा परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र त्यासाठी मद्यविक्रेत्यांकडे ऑनलाईन नोंदणीची आणि मद्याची घरपोच पोहोचविण्याची अट घालण्यात आली. तरीही तळीरामांनी स्वत:ची तहान भागविण्यासाठी या अटींचे पालन करत ऑनलाईन नोंदणी सुरु केली. मात्र विक्रेत्यांकडून किमान ३ हजार रूपयांची बुकींग करत असाल तरच तुम्हाला मद्य घरपोच मिळेल असे सांगत किरकोळ बुकिंग घेण्यास नकार दिला.
तसेच या बाटल्यांच्या मागे प्रती २० रूपयांची वाढही या विक्रेत्यांकडून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे घरी, बँकांमध्ये ठेवण्यात आलेली शिल्लक संपत आलेली असतानाच चालू महिन्याचा पगार मिळेल का नाही? याची शाश्वती नाही. त्यात आता दारू विक्रेत्यांनी अशी अटी घालण्यास सुरुवात केल्याने तहान भागवत सरकारच्या तिजोरीत भर घालायची कि नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याचे एका मद्यप्रेमीने सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात चौथा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मुंबईकरांसह राज्यातील नागरिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना दारू विक्रेते मोठ्या रकमेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी आग्रह धरत असल्याने सर्वसामान्य मद्यप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून ठिक ठिकाणी मद्य प्रेमी आणि दारू विक्रेत्यांमध्ये बाचाबाची होत असल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या आहेत.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *