Breaking News

सोमय्यांची मागणी, हल्ल्यांची सीबीआय चौकशी करा किरीट सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका

मागील आठवड्याच्या शेवटी अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना भेटण्यासाठी खार पोलिस ठाण्यात जावून येताना भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटून व्हनवुटीजवळ किंचिंत खरचटल्याने थोडेसे रक्त आले. मात्र त्यावर शिवसेना भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्याने अखेर सोमय्या यांनी आपल्यावरील हल्ल्याची सीबीआयनेच चौकशी करावी अशी मागणी एका याचिकेद्वारे मुंबी उच्च न्यायालयात केली.
आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे ( सीबीआय ) सोपविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका भाजपा नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.
या याचिकेत डॉ. सोमय्या यांनी त्यांच्यावर अलीकडच्या काळात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा व त्या अनुषंगाने पोलिसांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे. याचिकेत म्हटले आहे की, खार पोलीस स्थानकात आपल्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत आपण बांद्रा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यास गेलो होतो. माझे म्हणणे नोंदवून घेतल्यावर पोलीस निरीक्षक राजेश शांताराम देवरे यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा बनावट एफआयआर (क्र.०५८६/२०२२) दाखल केला. या एफआयआर विरोधात मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार दाखल केली.
या बाबत आपण राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडून आपल्यावरील हल्ल्यांची चौकशी योग्य पद्धतीने होण्याची खात्री नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवावा, असेही डॉ. सोमय्या यांनी याचिकेत नमूद केले.
दरम्यान, सोमय्या यांना जी जखम झाली. त्या जखमेतून वाहणाऱ्या रक्तावरून शिवसेना नेत्यांकडू, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून खिल्ली उडविण्यात आली. तसेच यावरून सोमय्याच्या नौटकीवरही टीका करण्यात आली. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेत हल्ल्याची सीबीआयमार्फत चौकशी कऱण्याची मागणी केली.

Check Also

पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *