Breaking News

३० एप्रिल आणि १ मे ला तीन मोठ्या राजकिय घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकिय गोष्टींना गती

राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जरी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधीही होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर ३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवसांमध्ये मोठ्या राजकिय घडामोडी होणार आहेत.
३० एप्रिल रोजी पुण्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची निर्धार सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ नेताही हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये होणार आहे. आणि त्याच दिवशी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये राजकिय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. तर १४ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शिवसेनेच्यावतीने मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाकडून कधीही निकाल येवू शकतो. तसेच या निकालामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाशिवाय निवडणूका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. या तयारीचाच प्रकार म्हणून या सभांचे आयोजन करण्यात आल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे.
त्याचबरोबर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका किमान नोव्हेंबर अखेर पर्यंत पुढे ढकलण्याचा विचार होता. मात्र आता ज्या पध्दतीने राजकिय सभांची तयारी आणि त्या अनुशषंगाने नवनवे विषय राजकिय पक्षांकडून पुढे आणले जात आहेत. त्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जूनच्या महिन्यात कधीही जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय मात्र जर मान्सूनची जोरदार सुरुवात झाली नाही तर याच महिन्यात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील. अन्यथा पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात निवडणूका होतील असाही अंदाज बांधण्यात येत आहे.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *