Breaking News

जिंदाल कंपनीतील आग सात तास झाले तरी अद्यापही धुमसतेय: मुख्यमंत्री भेट देणार एकाचा मृत्यू तर १७ जणांवर उपचार सुरु

नाशिक जिल्ह्यात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. एकाचा मृत्यू झाला तर १७ जणांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच १९ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. बॉयलरचा झालेल्या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली असून सात तास झाले तरी आग अजूनही धुमसत आहे. ही आग एवढी भीषण आहे की आगीचे लोळ दूरवरून दिसत आहे. आगीच्या या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कंपनीत सुर्दैवाने जास्त लोक अडकले नाहीत. कंपनीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. मी घटनास्थळी जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शहापूर, इगतपुरी, नाशिक महापालिका, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग यांची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून, आतमध्ये अडकलेल्या लोकाचं बचावकार्य सुरु आहे. जखमींवर सुयश रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, असे एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

कंपनीतील एका ठिकाणी अद्यापही तीन लोकं अडकले आहे. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे. तसेच, आगीवर नियंत्रणासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *