Breaking News

अजित पवार यांचा निर्धार, … आगामी निवडणुकांचे युध्द जिंकणार

कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युध्द आपल्याला जिंकायचे आहे असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केला.

मुंबईमध्ये पक्ष ज्या पध्दतीने वाढायला हवा होता. तसा वाढला नाही, आमचं लक्ष फक्त ग्रामीण भागाकडे राहिले. आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जे काम सुरू आहे त्यातून आपल्याला नक्कीच बळ मिळेल असा मला विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

मुंबईतील षनमुखानंद सभागृहात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता सन्मान मेळावा संपन्न झाला यावेळी अजित पवार बोलत होते.

अजित पवार यावेळी म्हणाले की, आता आपल्याला वेळ कमी आहे. सुरुवात चांगली झाली आहे त्यामध्ये सातत्य ठेवा. काम करताना खटका उडत असतो मात्र तो समजून घेऊन काम करा. आठवडयातील एक दिवस राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार मुंबईसाठी वेळ देतील. कार्यकर्ते कामाला लागले की काय होते हे आज दिसले. शिवसेना फक्त मुंबईत होती, त्यानंतर ती कोकणात पोचली. आपल्यातही ती जिद्द आहे आपणही तसे काम सुरू करु. सकाळी मुंबईतील वेगवेगळ्या भागात जाऊन लोकहिताच्या कामांची पाहणी आपण करू शकतो. याबरोबरच मुंबापुरीला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही असा शब्दही दिला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, धारावीतील टेंडरमुळे एका उद्योगपतीला फायदा होणार आहे अशी बोंब मारली जात आहे. त्याच्या खोलात जाऊन माहिती घेऊ. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची ताकद आणि धमक आपल्यात आहे. काहीजण आज करतो उद्या करतो सांगत असतात मात्र आपले काम तसे नाही लगेच निर्णय असे आपले काम आहे .महायुतीच्या माध्यमातून सरकार राज्यात काम करत आहेत. मुंबईत विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेत योग्य ती आणि म्हणावी अशी संख्या गाठू शकलो नाही. आपल्या वॉर्डात निवडणूक लढणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी असेही मत व्यक्त केले.

मुंबईतील टक्का वाढविण्यासाठी अजित पावर म्हणाले, समीरभाऊंच्या पाठीशी उभे राहून एकदिलाने काम केले तर पक्षाची ताकद मुंबईत उभी राहिल. एक एक पायरी म्हणजे कार्यकर्ता असतो. तो नेत्याला जोडणारा दुवा असतो. सर्व जाती धर्माच्या लोकांचा आपण आदर करतो. सर्व सणांमध्ये सहभागी होतो. हे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे आले पाहिजे. सत्तेकरता आम्ही सत्तेत गेलो नाही. सर्व सामान्य लोकांची कामे व्हायला हवी त्याकरता निर्णय घेतला. विरोधाला विरोध करायचा, मोर्चे काढायचे, यातून प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही विरोधकांना केला.

मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते – प्रफुल पटेल

या कार्यक्रमात बोलताना खा. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की, तुमच्यासोबत आम्ही आहोतच. मात्र मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते या षण्मुखानंद सभागृहाचे आणि पक्षाचे एक वेगळे नाते आहे. इथल्या बैठकीत अजित पवार यांनी एल्गार पुकारला होता. त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद अजित पवार यांना राज्यातून मिळाला होता. राज्यातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी अजित पवार यांच्या पाठीशी आहे हे सिध्द झाले आहे.

१९९१ मध्ये अजित आणि मी एकत्र लोकसभेत होतो हे सांगतानाच अजित पवार यांनी पक्षाची ताकद वाढवण्याचे काम केले हे स्पष्टपणेच प्रफुल पटेल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईकडे लक्ष कमी राहिले आहे. वारंवार कॉंग्रेसच्या सोबत राहिलो त्यामुळे कमी जागा लढवायचो. पसंतीच्या जागा कधीच मिळत नव्हत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पवार ग्रामीण भागात वाढवली आहे. आता शहराकडे अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी शहराकडे लक्ष घातले असल्याने त्यादृष्टीने काम करायचे आहे. समीर यांनी काम सुरू केले आहे त्यामुळे आज आज खरी लोकं सभागृहात दिसत आहेत असेही प्रफुल पटेल म्हणाले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *