Breaking News

छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य, …उडान तय करेगी आसमान किसका है

आता राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. न्यायालयात आपल्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त करतानाच एक तरी खासदार आपल्याला मिळाला पाहिजे ती जबाबदारी आपण घेतली आहे ती घेऊन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “मै उस पुराने जमाने का सिक्का हू, मुझे फेक ना देना, हो सकता है भले बुरे दिनो मैंही चल जाऊं ” त्याचप्रमाणे रात नही ख्वाब बदलता है, मंजिल तो वही रहती सिर्फ कारवा बदलता है… किस्मत बदले या ना बदले वक्त जरुर बदलता है… अशा शायरीतून शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

छगन भुजबळ म्हणाले, एकमेकांचे पाय खेचू नका. खेकडयासारखे वागू नका एकमेकांना साथ द्या. एकजूट होऊन काम केले तर यश निश्चित तुमचे आहे. शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा आम्ही बदलली नाही. अजित पवार आणि आम्ही सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत आहोत. भविष्यात नगरसेवक, आमदार निवडून आणायचे आहेत. घरी बसला आणि मोबाईलवर मेसेज पाठवून उपयोग नाही. ‘लोकांना लढणारी माणसे आवडतात रडणारी नाही’ तुम्ही लढा द्याल तेव्हा लोक तुमच्या सोबत येतील असेही सांगितले.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले, ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी बोललो आणि सगळे नेते तेच बोलत आहेत फक्त मी जास्तीचे आणि समाजाला समजेल असे बोलत आहे. तुम्ही ओबीसींमधील आरक्षण कशाला मागताय. तुम्हाला दिले होते ना… ते टिकले नाही मात्र त्यावेळी असलेल्या त्रुटी दूर केल्या जात आहेत. राजकारण कोण करत असेल तर पंचायत होईल असे समजवताना गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मी आज लढतोय का?… मंडल आयोगासाठी लढलो ना…पवारसाहेबांसोबत लढलो. कुणाच्या हक्कावर गदा येणार नाही असे काम आपल्याला करायचे आहे असेही स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या टीकला प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. कुणाच्या दादागिरीकडे लक्ष देऊ नका… उडान तय करेगी आसमान किसका है…अशा शब्दात शरद पवार यांना आव्हान दिले.

सुनिल तटकरे यांचा विश्वास, येत्या निवडणुकीत मुंबईत तिप्पट नगरसेवक…
समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे

समीर भुजबळ ज्यापध्दतीने तुम्ही या मुंबई शहरात काम करत आहात ते लक्षात घेता आता जेवढे नगरसेवक आहेत त्यापेक्षा तिप्पट नगरसेवक पुढच्या निवडणुकीत असतील अशी ताकद उभी राहिली असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, धर्मनिरपेक्ष विचारापासून फारकत न घेता राज्याच्या विकासासाठी आम्ही निर्णय घेतला. राजकीय विचारधारा घेऊन गतीमान भूमिका घेऊन काम करत आहोत.सरकारच्या माध्यमातून जनकल्याण योजना राबवल्या जात आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाची सोडवणूक केली आहे. अल्पसंख्याक समाजाच्याहिताची सोडवणूक दादा तुम्ही निधी देऊन केली आहे हेही आवर्जून सांगितले.

जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी जो पक्षाचा स्ट्राईक रेट होता त्यापेक्षा अधिक स्ट्राईक रेट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा तयार होईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *