Breaking News

उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना टॅग करत डिवचलं, ….चित्रा मेरी सासू चित्रा वाघ यांचे थेट अंबाबाईला साकडं

बिग बॉस फेम, अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्र-विचित्र फॅशनमुळे चर्चेत आहे. त्यातच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तोकड्या कपड्यांवरून उर्फीवर टीकेची झोड उठवित कारवाई करण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना पत्र देत उर्फी जावेदवर कारवाईची मागणी केली. तसेच महिला आयोगाकडे दादही मागण्याचा प्रयत्न केला. पण उलट आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु झाला. अखेर चित्रा वाघ यांनी थेट तुळजापूरच्या अंबाबाईलाच साकडं घातलं. तर दुसऱ्याबाजूला उर्फी जावेद ने आज ट्विटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनाच थेट डिवचलं.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला इशारा देताना म्हणाल्या की, उर्फी जावेद समोर आली, तर तिचं थोबाड फोडणार. पण, थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरु ठेवला, तर तिचं थोबाड फोडणार, या भाषेत सज्जड दम भरला.

मात्र आता उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. उर्फीने एक फोटो ट्वीट केला आहे. त्यावर तिने चित्रा वाघ यांना टॅग करत लिहलं की, लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये, मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू, असं उर्फीने खोचक शब्दात ट्विट करत चित्रा वाघ यांना थेट डिवचलं.

दरम्यान, उर्फी जावेद हिच्या विरोधात सातत्याने तक्रारी करूनही पोलिस आणि महिला आयोगाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने अखेर चित्रा वाघ या तुळजापूरात आल्या आणि त्यांनी अंबाबाईलाच साकंड घातलं. यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, तुम्ही चार भितींच्या आतमध्ये काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण, सार्वजनिक ठिकाणी आणि समाजात असल्यावर तुम्हाला कपड्यांचं भान असायला हवं. मुली जीन्स, टॉप्स, फ्रॉक घालतात. त्या उघड्या-नागड्या फिरत नाहीत. ते कपडे आणि ही बाई नंगानाच करते, याच्यात फरक आहे. फॅशन आणि नंगानाच याच्यामध्ये काही आहे का नाही?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

रस्त्यावर येऊन लोकांना चेकाळावयाचं काम सुरु आहे. पोलीस त्यांच काम करतील. आम्ही मात्र आमचं काम करु. ऐकलं तर ठिक आहे, नाहीतर सांगितलं आहे काय करणार आहोत. काल कोणतरी म्हटलं कपड्यांची अ‍ॅलर्जी आहे. सगळ्या अ‍ॅलर्जीच्या गोळ्या आपल्याकडे आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.

https://twitter.com/uorfi_/status/1612384120906342401?s=20&t=ny_7cnmKm5pu2RQrnpepFw

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *