मुंबईः प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील काही भागात आलेल्या पुरांमुळे अनेक नागरीकांच्या घरांतील सामानाबरोबरच विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही वाहून गेले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचण येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील पूरग्रस्त १ लाख विद्यार्थ्यांना दप्तरे देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त ४९ हजार २९१ विद्यार्थ्यांना, सांगली जिल्ह्यातील २८ हजार ८६३ विद्यार्थी, सातारा जिल्ह्यातील ५ हजार ९१० विद्यार्थी आणि कोकणातील १६ हजार विद्यार्थ्यांना एक लाख दप्तरे वाटण्यात येणार आहे.
पूरस्थितीत स्थानिकांना अन्नधान्य, चादरी, ब्लँकेट २५ हजार रूग्णांना पुरतील इतका औषधांचा साठा, संसारोपयोगी साहित्याची १०० वाहने शिवसेनेने पोहोचविली आहेत.
