Breaking News

Tag Archives: sangali

महाराष्ट्रातील काँग्रेस लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहिर ?

राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा निवडणूकांची यादी जाहिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने संभाव्य लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. तर काँग्रेसकडून १२ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी …

Read More »

शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळ विकासासाठी १३ कोटींचा निधी

स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा सांगली तालुक्यातील शिराळा येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यास राज्य शासनाच्या शिखर समितीची मान्यता मिळाली असून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने त्यासाठी १३ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला आहे. …

Read More »

महाराष्ट्रातील पूरव्यवस्थापन प्रकल्प जागतिक बँकेच्या पैशातून पूर्ण होणार

मागील चार ते पाच वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना पावसाळ्याच्या कालावधीत नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे या भागातील नद्यांना येणारे अतिरिक्त पाणी नाईलास्तव कर्नाटकला सोडावे लागते. या अनुषंगाने राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि विद्यमान या खात्याचा पदभार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूरव्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची घोषणा …

Read More »

सतेज पाटील यांचा इशारा, अलमट्टीतील पाणी सोडायला लावा अन्यथा, कोल्हापूर-सांगली… पूर उपाययोजनाबाबत दोन्ही राज्यांमध्ये तातडीने मंत्री स्तरीय बैठक घ्यावी

धरण क्षेत्रात असलेल्या पावसाच्या जोरामुळे कोल्हापूर, सांगली परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकची मंत्री स्तरीय बैठक तातडीने आयोजित करावी आणि अलमट्टी धरणाचा विसर्ग १ लाख क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज …

Read More »

सुधा मुर्ती आणि संभाजी भिडेंच्या या फोटोमागील सत्य : आवर्जून वाचा

कालपासून एका कार्यक्रमानिमित्त सांगलीमध्ये आलेल्या ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेत त्यांच्या पाया पडल्याचे काही फोटो व्हायरल झाले. त्यामुळे बुध्दीमान आणि संवेदनशील असलेल्या सुधा मुर्ती या संभाजी भिडे यांच्या पाया कशा पडू शकतात असा सवाल अनेक नागरिकांना पडला …

Read More »

पॉझिटिव्हीटी दर वाढला मग लसीकरणही वाढवा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या चारही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. …

Read More »

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार दोन महिन्याचे वेतन देणार सरकारी कर्मचाऱ्यांनीही एक-दोन दिवसाचे वेतन द्यावे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

सांगली: प्रतिनिधी अतिवृष्टीचा फटका नऊ जिल्ह्यांना बसला असल्याने या भागातील नुकसान भरपाईसाठी मोठ्या प्रमाणावर महामदतीची गरज आहे. त्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी लागणार आहे. यापार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार हे आपले दोन महिन्याचा पगार देणार असल्याची घोषणा करत राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनीही आपले एक-दोन दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी द्यावे असे …

Read More »

आजी काळजी करू नका… दोन तीन दिवसात बर्‍या व्हाल; ९० वर्षांच्या आजीला दिला धीर कोरोना वॉर्डमध्ये जाऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रुग्णांची केली विचारपूस

सांगली: प्रतिनिधी “आता कसं वाटतंय आजी …. काही काळजी करू नका… दोन – तीन दिवसात बर्‍या व्हाल…” असा धीराचा शब्द सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या ९० वर्षांच्या आजीला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज …

Read More »

मंदिर सुरु करण्याबाबत विनंत्या करण्यात येतायत… वाचा मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले याप्रश्नी पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूरचा आढावा घेताना सूचक वक्तव्य

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत अनेक राजकिय पक्ष, संघटनांच्यावतीने विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावी लागणार असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत आणखी काही दिवस तरी राज्यातील मंदिरे उघडली जाणार नसल्याचे सुतोवाच केला. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनावरील उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी वरील सूचक …

Read More »

“त्या” पुराला अलमट्टी नव्हे तर अतिवृष्टी आणि अतिक्रमण, बांधकामे जबाबदार वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर

मुंबई : प्रतिनिधी गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भाग आलेला पूर हा कर्नाटकातील अलमट्टी आणि हिपरग्गा जलाशयामुळे आलेला नसल्याचा अहवाल वडनेरे समितीने दिला असून या पुरास प्रामुख्याने नदीच्या परिसरातील पात्राचे संकुचिकरण, अतिवृष्टी याबरोबरच नागरीकरण, अतिक्रमण आणि बांधकामे जबाबदार असल्याचा ठपका या समितीने ठेवला. सदर अहवाल भविष्यकालीन उपायोजनासाठी नक्कीच उपयोगी …

Read More »