राममोहन नायडू यांची माहिती, एएआयबीचा अहवाल लवकरच अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटना प्रकरणी तपास अहवाल

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालाची (एएआयबी) लवकरच घोषणा करण्याची अपेक्षा आहे, असे नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी आज सांगितले. त्यांनी चालू तपासात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाची वचनबद्धता अधोरेखित केली.

१२ जून रोजी ही दुःखद घटना घडली, जेव्हा लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच एका वैद्यकीय वसतिगृह संकुलात कोसळले. विमानातील २६० जणांपैकी २५९ जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे हा अलिकडच्या काळात भारतातील सर्वात घातक विमान अपघात ठरला. एक प्रवासी चमत्कारिकरित्या वाचला.

राममोहन नायडू म्हणाले की, लवकरच… एएआयबी त्यावर काम करत आहे… ही एएआयबीची जबाबदारी आहे, त्यांना त्यांचे काम करू द्या,” असे माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

राममोहन नायडू  यांनी पुढे सांगितले की, मंत्रालय संपूर्ण प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. “संपूर्ण तपासात पारदर्शकता आणि जबाबदारी आहे याची आम्ही खात्री करत आहोत,” असे सांगितले.

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (आयसीएओ) नियमांनुसार, एएआयबीला अपघाताच्या ३० दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २६ जून रोजी एक स्थिती अहवाल आधीच जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये कारणे न सांगता प्रारंभिक तथ्ये स्पष्ट करण्यात आली होती.

About Editor

Check Also

क्लीन मॅक्सच्या आयपीओला सेबीची मंजूरी ५ हजार २०० कोटीचा आयपीओ, लवकरच बाजारात येणार

देशातील सर्वात मोठी व्यावसायिक आणि औद्योगिक (सी अँड आय) अक्षय ऊर्जा पुरवठादार, क्लीन मॅक्स एन्व्हायरो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *