Breaking News

इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. मराठी चित्रपट परदेशी जाणार कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड

मुंबई : प्रतिनिधी

मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने फ्रान्समध्ये ८ मे २०१८ ते १८ मे २०१८  या कालावधीत होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणा-या ३ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेले चित्रपट पुढीलप्रमाणे- १) इडक (मे.किया फिल्मस प्रा.लि.), २) क्षितीज (मे.मिडिया फिल्म क्राफट), ३) पळशीची पी.टी. (मे.ग्रीन ट्री प्रोडक्शन)

या चित्रपट महोत्सवाच्या चित्रपटांसाठी २६ मराठी चित्रपटांचे परिक्षण करण्यात आले. या २६ चित्रपटातून परिक्षण समितीने उपरोक्त ३ चित्रपटांची निवड कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी केली आहे.

सदर परिक्षण समितीमध्ये १) श्री.रघुवीर कुलकर्णी, (दिग्दर्शक, निर्माता), २)श्रीमती रेखा देशपांडे, (चित्रपट समिक्षक), ३) श्रीमती अरुणा जोगळेकर, (पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माता), ४) श्री.प्रमोद पवार, (लेखक, अभिनेता), ५) श्री.पुरुषोत्तम लेले, (निर्माता, दिग्दर्शक तथा महामंडळाचे अशासकीय सदस्य) या तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे. या समितीने या ३ चित्रपटांची निवड केली आहे.

 

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *