Breaking News

प्रेम विवाह करणाऱ्यांनो आता निर्धास्त रहा आंतरजातीय विवाहासाठी लवकरच होणार स्वतंत्र कायदा

मुंबई : प्रतिनिधी

तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या किंवा तारूण्यात असलेल्या अनेक तरूण-तरूणी वेगवेगळ्या जातीची, धर्माची आणि पंथाची असतात. मात्र प्रेम या एका धाग्यामुळे ते दोघेजण वेगवेगळ्या जातीची असली तरी एकत्र जीवन जगण्यासाठी रूढी-परंपरा आणि समाजाची बंधने जुगारून आंतरजातीय विवाह करतात. आता अशा आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना संरक्षण मिळावे, जातीय सलोखा राखण्यासाठी महिलांना संरक्षण मिळावे, सामाजिक बहिष्कार, अवहेलना यापासून सुरक्षितता मिळावी. या उद्देशाने आंतरजातीय विवाहासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार असून यासाठी अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एस. थुल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने मसुदा समिती गठीत केली आहे.

यामध्ये विधी व न्याय विभागाचे सहसचिव अविनाश बनकर, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी ॲड. केवल उके, सहयोगी प्रा. डॉ. संदेश वाघ, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, श्रीमती राही भिडे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

या समितीने तीन महिन्यांत आपला अहवाल शासनास सादर करावयाचा आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २१ मार्च रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. 201803211737006922 असा आहे.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *