Breaking News

विजू मानेचा शिकारी वाढविणार हिट न्युड पाठोपाठ आणखी एक वेगळा चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी

मराठी सिनेसृष्टीत आज खऱ्या अर्थाने कधीही समोर न आलेले धाडसी विषय पडद्यावर मांडण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले जात आहेत. दिग्दर्शक रवी जाधवच्या ‘न्यूड’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच ‘शिकारी’ हा आणखी एक काहीसा बोल्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘एप्रिलमध्ये हिट वाढणार’ या टॅगलाईनने या चित्रपटाची जोरदार पब्लिसिटी सुरू करण्यात आली आहे.

‘शिकारी’बाबत सध्या कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. आजघडीला केवळ टीझरच्या माध्यमातून या सिनेमाची पब्लिसिटी सुरू आहे. टप्प्याटप्प्याने या चित्रपटाच्या रहस्यावरून पडदा उघडला जाणार असल्याचं ‘शिकारी’शी संबंधित असलेल्या सूत्रांकडून समजतं. या चित्रपटाचं निर्मिती-दिग्दर्शन विजू माने यांनी केलं आहे. आनंद वैद्यनाथन या चित्रपटाचे सहाय्यक निर्माते आहेत. ‘शिकारी’च्या ब्लॅक अँड व्हाईट पोस्टरवर केवळ पाठमोरी अर्धनग्न स्त्री पाहायला मिळते. शीर्षक आणि पोस्टर यावरून हा चित्रपट बोल्ड असणार याचा अंदाज सहजपणे लागतो, पण चित्रपटातील इतर कलाकार-तंत्रज्ञांबाबतची काहीच माहिती सध्या उपलब्ध करण्यात आलेली नाही.

हे चित्र पाहता मराठी सिनेमाही मार्केटिंगचे फंडे वापरून रसिकांना आकर्षित करण्याची योजना आखत असून त्यात यशस्वी होत असल्याचं जाणवतं. पूर्वीप्रमाणे सर्व काही एकाच पोस्टरमध्ये दाखवण्याचा ट्रेंड सध्या मागे पडला असून रसिकांची उत्कंठा वाढवत प्रमोशन करण्याचा मार्ग अवलंबला जात आहे. ‘शिकारी’ हा सिनेमा याचं उत्तम उदाहरण असल्याचं म्हणता येईल.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *