Breaking News

‘वेगे वेगे धावू…’ला लाभला शंकर महोदवन यांचा स्वर बालपण उघडून दाखविणारे लहान मुलांसाठी खास गाणं

मुंबई : प्रतिनिधी

छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिलं तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चाललेली असते हे नक्की कळू शकेल. मुलांच्या विश्वात रमताना आपणही लहान होतो. छोट्यांच्या दुनियेत घेऊन जात त्यांच्या मनातील विश्व, गायक–संगीतकार शंकर महादेवन उलगडून दाखवणार आहेत. मुलांशी संवाद साधत त्यांच्या बालविश्वात घेऊन जाणारं सुमधुर गीत नुकतंच शंकर महादेवन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलं. योगायतन फिल्म्सच्या ‘परी हूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटातील हे गीत अभिषेक खणकर यांच्या लेखणीतून साकारलं असून, संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी संगीत साज चढवला आहे.

‘वेगे वेगे धावू…’ हे गीत आठवताच अनाहुतपणे आपल्या कानांवर जुन्या काळातील ‘वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ…’ या गीताचे सूर तरळू लागतात. पण शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत पूर्णपणे नवीन आहे.

‘करूया किलबिल चिऊ काऊ सवे जरा… बोलकी बोबडी …

चांद ताऱ्याची वाऱ्याची विणूया ना जरा मलमली… गोधडी…

वेगे वेगे धावू कुशीमध्ये घेऊ चांदव्यात लपला ससोबा जरासा….

असे बोल असलेल्या या गीतातून बालपणाची मौज त्यातील निरागसता टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बालविश्वाची सफर घडवणारं हे गीत प्रत्येकाला आपल्या बालपणाची आठवण करून देईल, असा विश्वास गायक शंकर महादेवन यांनी याप्रसंगी व्यक्त केला. जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधत एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा  ‘पॅशनेबल’ प्रवास ‘परी हूँ मैं’ चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला राजेंद्र सिंह यांनी केली असून, दिग्दर्शन रोहित शिलवंत यांचं आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार या चित्रपटात आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *