Breaking News

लक्ष वेधून घेणार ‘लग्न मुबारक’ एका अनोख्या प्रेम कथेवर आधारीत चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी

कथानकातील वैविध्यासोबतच मराठी सिनेमांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं शीर्षक… उत्कंठावर्धक शीर्षकाची फार मोठी परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. प्रथमदर्शनी रसिकांना आकर्षित करण्याचं काम शीर्षक बजावत असतात. यामुळेच शीर्षकाद्वारे आपल्या सिनेमाकडे रसिकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक दिग्दर्शक करीत असतो. यात आता आणखी एका सिनेमाचा समावेष झाला आहे. मुस्लिम बांधवांमध्ये निकाह झाल्यावर शादी मुबारक म्हणत लग्नाच्या शुभेच्छा देण्याची प्रथा आहे, पण एका आगामी सिनेमाचं ‘लग्न मुबारक’ हे शीर्षकच लक्षवेधी ठरत आहे.

‘लग्न मुबारक’ या सिनेमात काय दडलंय ते ११ मे २०१८ रोजी महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना समजेल. अभय पाठक प्रॉडक्शन्स सह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘लग्न मुबारक’ या चित्रपटात वर्तमान परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. आज समाजामध्ये धर्माचं, जातीपातीचं जे काय राजकारण खेळलं जातंय. त्यामुळे अनेकांचं नुकसान झालं आहे. काही लोक धर्माचा-जातीचा वैयक्तिक फायद्यासाठी कसा वापर करून घेतात. या गोष्टीवर ‘लग्न मुबारक’ हा सिनेमा प्रेमकथेद्वारे भाष्य करतो. चेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’मध्ये दिग्दर्शक संजय जाधव अभिनय करताना दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, सिद्धांत मुळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

संगीतकार साई–पियुष यांनी संगीतबद्ध केलेलं आदर्श शिंदेच्या आवाजातील या सिनेमातील ‘वन्स मोर लाव’ हे गीत सध्या चांगलंच गाजत आहे. याखेरीज ट्रॉय अरिफ यांनी संगीत दिलेलं एक रोमँटिक गाणंही या सिनेमात आहे. ‘लग्न मुबारक’साठी अक्षय कर्डक यांनी गीतलेखन केले आहे. ‘लग्न मुबारक’ या सिनेमाची निर्मिती गौरी पाठक यांची असून छायांकन भूषण वाणी यांनी केलं आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *