Breaking News

सुरुचीचा नवा मंत्र अवयव दान म्हणजेच जीवनदान...

मुंबई : प्रतिनिधी

‘पहचान’ या हिंदी मालिकेसोबतच ‘एक तास भुताचा’, ‘ओळख’, ‘आपलं बुवा असं आहे’ या मालिकांमध्ये लक्षवेधी अभिनय केल्यानंतर ‘का रे दुरावा’ या मालिकेत आदितीची भूमिका साकारत खऱ्या अर्थाने लोकप्रिय झालेली सुरुची आडारकर सध्या डॅाक्टर बनली आहे. झी युवा वाहिनीवर सुरू असलेल्या ‘अंजली’ या मालिकेत ती शीर्षक भूमिका साकारतेय. बऱ्याच चढउतारानंतर या मालिकेचं कथानक सध्या एका वेगळ्याच वळणावर पोहोचलं आहे. या वळणावर अंजली म्हणजेच सुरूची आपल्या चाहत्यांना अवयवदानाविषयी जागृत करणार आहे.

आज जगभरातील अनेक संस्था ऑर्गन डोनेशन म्हणजेच अवयव दानावर काम करत आहेत. जसं नेत्र दान करता येतं, तसच हृदय, यकृत, किडनी, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, फुफ्फुस आणि त्वचादेखील दान करता येते. अर्थात वरील पैकी त्वचा आणि नेत्र दान सोडता बाकीच्या गोष्टी ब्रेन डेड अवस्थेतील पेशंट्च दान करु शकतो. किडनी, यकृताचा काही भाग हा जीवित व्यक्ती देखील दान करु शकते पण त्यासाठीचे नियम वेगळे आहेत. या सर्व गोष्टींची माहिती लोकांना व्हावी यासाठीच ‘अंजली’ या मालिकेमध्ये ऑर्गन डोनेशन वर एक ट्रॅक दाखवण्यात आला आहे. या ट्रॅकमध्ये एका पेशंटला ऑर्गन हवे असते, पण ते मिळत नसते, पण कुठेतरी कोणाचा तरी मृत्यू होतो आणि केवळ त्या व्यक्तीने ऑर्गन डोनेट केले असल्यामुळेच या पेशंटला जीवनदान मिळतं.

या ट्रॅकबद्दल आणि अवयवदानाबाबत सुरुची म्हणते की, आपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा अधिक आनंदाचं असं काय असेल? असं केल्यानंतर देखील तुमच्या पार्थिवाचं तुमच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करता येतातच, तेव्हा धार्मिक क्रियाकर्म शक्य होतील का नाही हा विचार मनात येत असेल तर त्याचं उत्तर निश्चीतच धार्मिक अंत्यविधी करता येतील असंच आहे. मुळात अशी इच्छा व्यक्त करुन डोनर कार्ड भरणं खूप महत्वाचं असतं. आपली इच्छा नोंदवून तसं आपल्या जवळच्या कुटुंबियांस सांगणं केव्हाही योग्यच. मी सुद्धा माझे ऑर्गन डोनेट करणार आहे आणि माझी विनंती आहे की, सर्वांनी आपले ऑर्गन डोनेट करण्याबद्दल विचार करावा. अवयव दान म्हणजेच जीवनदान.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *